Cheteshwar Pujara : दुखापतीशी झुंज देत पुजाराची रणजीमध्ये तुफानी खेळी! BCCI निवड समितीला विचार करण्यास पाडले भाग

चेतेश्वर पुजारा सध्याच्या रणजी ट्रॉफी मोसमात सौराष्ट्रकडून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे...
Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujarasakal

Cheteshwar Pujara : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्याच्या रणजी ट्रॉफी मोसमात सौराष्ट्रकडून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुखापतग्रस्त असतानाही त्याने 91 धावांची अर्धशतकी खेळी खेळली आणि सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुजाराचे शतक नऊ धावांनी हुकले, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 62 वे शतक ठरले असते. चमकदार कामगिरी करूनही इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Cheteshwar Pujara
Rishabh Pant :'त्या क्षणाला काय वाटलं?', भीषण कार अपघाताबद्दल पहिल्यांदाच बोलला ऋषभ पंत

पुजाराने या सामन्यात काही शानदार शॉट्स खेळले. 133 चेंडूंचा सामना करताना त्याने 10 चौकारांच्या मदतीने 91 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये 7000 धावा करणारा सौराष्ट्राचा दुसरा फलंदाज ठरला. त्यांच्या आधी सितांशु कोटकने 7000 चा आकडा पार केला होता.

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चेतेश्वर पुजाराने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 20000 धावाही पूर्ण केल्या. यासह तो सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांसारख्या महान भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. पुजाराने या महिन्याच्या सुरुवातीला झारखंडविरुद्ध आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 17 वे द्विशतक झळकावले. चेतेश्वर पुजारा सध्या 6 डावात 535 धावा करत या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Cheteshwar Pujara
Sarfaraj Khan : पहाटे सुरू झाली नेटप्रॅक्टिस! टीम इंडियात जागा मिळल्यानंतर सरफराज खान पोहचला क्रॉस मैदानात

चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. अंतिम फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पुजाराची गणना भारताच्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com