Ranji Trophy : पुजारा अपयशी; तरीही सौराष्ट्राचे वर्चस्व रणजी करंडक : महाराष्ट्राच्या ७ बाद ११६ धावा

अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याला महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट करंडकातील 'अ' गटातील लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले. हितेश वाळुंजच्या गोलंदाजीवर तो तीन धावांवरच बाद झाला.
pujara
pujarasakal

सोलापूर : अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याला महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट करंडकातील 'अ' गटातील लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले. हितेश वाळुंजच्या गोलंदाजीवर तो तीन धावांवरच बाद झाला. धर्मेद्र जडेजा (७२ धावा) व प्रेरक मंकड (५६ धावा) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर सौराष्ट्राने पहिल्या डावात २०२ धावा फटकावल्या. महाराष्ट्राची पहिल्या दिवसअखेरीस ७ बाद ११६ धावा अशी अवस्था झाली असून, अजूनही त्यांचा संघ ८६ धावांनी पिछाडीवर आहे.

सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हितेश वाकुंजच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्राचा निम्मा संघ अवघ्या ५४ धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यामध्ये चेतेश्वर पुजाराचाही समावेश होता. त्याला पायचीत बाद देण्यात आले. त्यानंतर धमेंद्र जडेजा व प्रेरक मंकड या जोडीने ११८ धावांची भागीदारी करीत सौराष्ट्राचा डाव सावरला. तरणजीत ढिल्लो याने प्रेरक याला ५६ धावांवर बाद करीत जोडी तोडली. या खेळीत त्याने सात चौकार मारले. हितेश याने धमेंद्र याला ७२ धावांवर बाद केले. धमेंद्र याने आपली खेळी ८ चौकार व ३ षटकारांनी सजवली. सौराष्ट्राचा पहिला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला.

pujara
Mumbai Cricket Team : धोनीचा पठ्ठ्या बनला मुंबईचा उपकर्णधार! दमदार कामगिरीनंतर मिळाली मोठी जबाबदारी

फलंदाजांची सुमार कामगिरी

सौराष्ट्राला पहिल्या डावात २०२ धावांवर गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावाला सुरुवात केली. पण धर्मेंद्र जडेजा व युवराज दोदिया यांच्या छान गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.

संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र- पहिला डाव सर्व बाद २०२ (हार्दिक देसाई २५, धमेंद्र जडेजा ७२, प्रेरक मंकड ५६, हितेश वाळुंज ६/९३, तरणजीत ढिल्लो ४/५४) वि. महाराष्ट्र ७ बाद ११६ घावा (कौशल तांबे ३७, अंकित बावणे ३४, धर्मेंद्र जडेजा ४/४७, युवराज दोदिया २/२३).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com