Ranji Trophy : मुंबई अव्वल स्थानी कायम

भारतातील स्थानिक क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाने रविवारी बंगालचा एक डाव व चार धावांनी पराभव करीत यंदाच्या रणजी क्रिकेट करंडकातील चौथा विजय संपादन केला.
Ranji Trophy mumbai
Ranji Trophy mumbai sakal

कोलकाता : भारतातील स्थानिक क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या क्रिकेट संघाने रविवारी बंगालचा एक डाव व चार धावांनी पराभव करीत यंदाच्या रणजी क्रिकेट करंडकातील चौथा विजय संपादन केला.

उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या पराभवालाही त्यांनी लीलया मागे टाकले. या विजयासह मुंबईच्या संघाने २७ गुणांसह गुणतक्तातील पहिले स्थान कायम राखले. मुंबईच्या संघाने पहिल्या डावात ४१२ धावा फटकावल्या होत्या. बंगालचा पहिला डाव शनिवारी १९९ धावांवरच आटोपला.

Ranji Trophy mumbai
Ranji Trophy : महाराष्ट्रासमोर १०४ धावांचे लक्ष्य ; सौराष्ट्राविरुद्धची रणजी लढत रोमहर्षक स्थितीत

मुंबईच्या संघाने रविवारी त्यांना फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. बंगालच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही चमक दाखवता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर अनुस्तुप मजुमदार या डावात १४ धावांवर बाद झाला.

अभिषेक पोरेल याने ८३ चेंडूंमध्ये १५ चौकारांसह ८२ धावांची खेळी केली, पण इतरांची साथ त्याला लाभली नाही. मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थी याने ५२ धावा देत सात फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने या लढतीत दहा फलंदाजांना बाद करीत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com