Ranji Trophy: मयंक अग्रवालचे द्विशतक व्यर्थ! सौराष्ट्राने कर्नाटकचा उडवला धुव्वा

सौराष्ट्राने अंतिम फेरीत मारली धडक
  saurashtra-beat Mayank Agarwal karnataka
saurashtra-beat Mayank Agarwal karnataka

Ranji Trophy 2022-23 : रणजी ट्रॉफी 2022-23 चा दुसरा उपांत्य सामना कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यात खेळल्या गेला. सौराष्ट्रने शानदार कामगिरी करत 4 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह संघाने अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत त्याचा सामना बंगालशी होणार आहे.

  saurashtra-beat Mayank Agarwal karnataka
Ranji Trophy: बंगालची अंतिम फेरीत थाटात एन्ट्री! गतविजेत्या मध्य प्रदेशला चारली पराभवाची धूळ

कर्नाटकने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या होत्या. यादरम्यान कर्णधार मयांक अग्रवालने शतक झळकावले. 429 चेंडूंचा सामना करत त्याने 249 धावा केल्या. त्याच्या खेळीत 28 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक फलंदाज श्रीनिवासने 66 धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या डावात संघ 234 धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये मयंकने 55 धावांचे योगदान दिले. निकिन जोसने शतक केले. त्याने 109 धावांची खेळी खेळली.

सौराष्ट्रने पहिल्या डावात 527 धावा केल्या. कर्णधार अर्पितने द्विशतक झळकावले. त्याने 406 चेंडूंचा सामना करत 202 धावा केल्या. अर्पितच्या खेळीत 21 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शेल्डन जॅक्सनने 23 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 160 धावा केल्या. चिराग जानीने 72 धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे संघाने 117 धावा करत सामना जिंकला.

  saurashtra-beat Mayank Agarwal karnataka
IND vs AUS: भारताचा एक डाव 132 धावांनी विजय तरी WTC मधून होऊ शकतो बाहेर

आता 16 फेब्रुवारीला अंतिम फेरीत सौराष्ट्रचा सामना बंगालशी होणार आहे. बंगालनेच पहिल्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा 306 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. ध्रुव शौरीने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 860 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके झळकावली आहेत. तर प्रशांत चोप्राने 5 शतके झळकावली आहेत. पण सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत प्रशांत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 783 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com