esakal | T-20 World Cup : आम्ही नाही जा! राशिद खान रुसला...
sakal

बोलून बातमी शोधा

Rashid Khan

T-20 World Cup : आम्ही नाही जा! राशिद खान रुसला...

sakal_logo
By
सुशांत जाधव

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यावर क्रिकेटचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. क्रिकेट वर्तुळात यासंदर्भात चर्चा रंगत असताना तालिबानने क्रिकेटवरील प्रेम दाखवून देत खेळात कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही टी-20 वर्ल्ड कपची तयारी सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानच्या संघाचीही घोषणा करण्यात आली.

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली संघ निवडण्यात आला. पण त्यानंतर काही क्षणातच राशिदने कॅप्टन्सी करणार नसल्याचे जाहीर केले. राशिद खानने ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. पण संघ निवडीसंदर्भात मत विचारात घेतले नाही. या नाराजीतून राशिद खानने कर्णधार पद सोडले आहे. यासंदर्भात त्याने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: IND vs ENG 5th Test: हुश्श! टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

राशिद खानने ट्विटमध्ये लिहिलंय की, कर्णधार आणि देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने संघ निवडीच्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला अधिकार प्राप्त होतो. सिलेक्शन कमिटी आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने जो संघ निवडला त्यावेळी माझे मत विचात घेतले नाही. त्यामुळेच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी खेळणं अभिमानास्पद वाटते, असा उल्लेख त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

हेही वाचा: इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

तालिबान राजवटीत असलेल्या अफगाणिस्तानने ओमान आणि युएईच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी 18 सदस्यीय टीमची घोषणा केली. त्याशिवाय 2 राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संघ निवडीत कर्णधाराला कोणताही विचार घेतला नसल्यामुळे आता अफगाणिस्तान संघाचा कॅप्टन कोण असा प्रश्न उभा राहिला आहे.

loading image
go to top