
चिपळूण : दीपिका जोसेफ, सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे या खेळाडूंवर बंदी असतानाही पुण्याच्या महिला संघाने आपणच राज्य कबड्डीत सरस असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
पुण्याने गतविजेतेपद राखताना मुंबई शहरचा अंतिम सामन्यात 22-20 असा पराभव केला. अंकिता जगताप, मानसी सावंतने पुण्याला सुरुवातीपासून वर्चस्व देताना विश्रांतीस 15-9 वर्चस्व राखले होते. उत्तरार्धात पूजा यादव, मेधा कदमने जोरदार प्रतिकार केला, पण पुण्याने शांतपणे खेळ करीत विजेतेपद निसटू दिले नाही.
पुण्याने सर्वाधिक 22 वेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. तीन वर्षांपूर्वी कराड स्पर्धेत उपनगरने पुण्याला हरवले होते. तो धक्का सोडल्यास पुण्याचीच स्पर्धेवर हुकमत आहे. त्यांनी गेल्या 13 पैकी 12 स्पर्धांत बाजी मारली आहे.
दरम्यान, रात्री उशिरा संपलेल्या पुरुष विभागाच्या सामन्यात यजमान रत्नागिरीने मुंबई शहरचे आव्हान 31-28 असे परतवून विजेतेपद पटकावले. त्यापूर्वी गतविजेत्या रायगडला उपांत्य फेरीत ताकदवान रत्नागिरीविरुद्ध हार पत्करावी लागली. अजिंक्य पवार द्वयीने रत्नागिरीस विजयी केले. मुंबई शहरने गतउपविजेत्या सांगलीस संधी दिली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.