esakal | IND vs ENG: रवी शास्त्री २ आठवडे क्वारंटाइन; पाचव्या कसोटीसाठी अनुपस्थित
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri

रवी शास्त्री २ आठवडे क्वारंटाइन; पाचव्या कसोटीसाठी अनुपस्थित

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng Tests: शनिवारी रात्री शास्त्रींची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

Ind vs Eng Test: भारतीय संघाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कोरोना रिपोर्ट (Covid 19 Positive) शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रवी शास्त्रींसह दोन प्रशिक्षक आणि एक सपोर्ट स्टाफ सदस्याला आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवण्यात आले. त्यात नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रवी शास्त्रींना (Ravi Shastri) पुढील दोन आठवडे क्वारंटाइन (Quarantine) राहणे बंधनकारक असल्याने पाचव्या कसोटीसाठी (5th Test) शास्त्री अनुपस्थित असणार आहेत.

हेही वाचा: शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! दुहेरी अर्धशतक ठोकत केला पराक्रम

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी (४ सप्टेंबरला) पॉझिटिव्ह आला. त्यानंतर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, श्रेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजीओ नितीन पटेल यांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. शास्त्री यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याने ती पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघासोबत नसतील. पण त्यांच्यासोबत असणाऱ्या सपोर्ट स्टाफला मात्र कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास संघासोबत पुढील प्रवास सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: "मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया

रवी शास्त्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आता पुढील १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे, १० सप्टेंबरपासून पाचवी कसोटी सुरू होणार आहे. त्यासाठी त्यांना संघासोबत उपस्थित राहता येणार नाही. मँचेस्टरला ही कसोटी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ युएईला रवाना होणार आहे. पण रवी शास्त्री यांचे मायदेशी परतणेही लांबणीवर पडणार आहे.

loading image
go to top