IND vs SA : 'मंकडिंग'ला अश्विनचं नाव द्या संतप्त चाहत्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravichandran Ashwin Attempts to Mankad David Miller

IND vs SA : 'मंकडिंग'ला अश्विनचं नाव द्या संतप्त चाहत्यांची मागणी

Ravichandran Ashwin Mankad IND vs SA : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाला त्यांच्या तिसऱ्या सुपर-12 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 9 विकेट गमावून 133 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू राखून सामना जिंकला. टीम इंडियाचे या सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. क्षेत्ररक्षणात इतके सोपे झेल सोडले की संघाचा पराभव झाला. अशीच एक संधी टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपल्याच चेंडूवर सोडली.

हेही वाचा: Rohit Sharma : आम्ही त्यांना जिंकण्याची संधी दिली; रोहितने 'यांच्यावर' फोडले पराभवाचे खापर

कर्णधार रोहित शर्माने त्यावेळी 18 व्या षटकात अश्विनकडे चेंडू सोपवून मोठी जोखीम पत्करली आणि इथून सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेकडे वळला. या षटकात अश्विनला डेव्हिड मिलरने एकामागून एक सलग दोन षटकार ठोकले. हे षटक सुरू होण्यापूर्वी आफ्रिकन संघाला विजयासाठी 18 चेंडूत 25 धावा हव्या होत्या, परंतु षटकातील पहिले दोन चेंडू मैदानाबाहेर पडल्यानंतर 16 चेंडूत केवळ 13 धावा बाकी होत्या.

त्यानंतर अश्विनने आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला बाद करून गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. वेन पारनेल नवा फलंदाज म्हणून क्रीजवर आला. अश्विनने त्याच्या पुढच्या चेंडूवर गोलंदाजी करण्याची तयारी केली, परंतु तो स्टंप जवळ येऊन थांबला आणि नॉन-स्ट्राइकिंग एंडवर मिलरच्या बॅटकडे पाहिले. त्यावेळी मिलरची बॅट क्रीजपासून दूर होती आणि अश्विन त्याला धावबाद करण्याऐवजी पाहतच राहिला, असे रिप्लेमध्ये दिसून आले.

अश्विनने वादग्रस्त पद्धतीचा वापर करून फलंदाजांना धावबाद करण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास पाहता संतप्त चाहते आता मंकडिंगचे नाव देण्याची मागणी करत आहेत.