Rohit Sharma : आम्ही त्यांना जिंकण्याची संधी दिली; रोहितने 'यांच्यावर' फोडले पराभवाचे खापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Rohit Sharma : आम्ही त्यांना जिंकण्याची संधी दिली; रोहितने 'यांच्यावर' फोडले पराभवाचे खापर

Rohit Sharma IND vs SA : टी20 विश्वचषक 2022 च्या 30 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारताविरुद्धच्या या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले, तर पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.

हेही वाचा: IND vs SA : आफ्रिका पोहचवली टॉपवर; भारताच्या पराभवाने पाकची झाली अडचण

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या 68 धावांच्या खेळीमुळे 133 धावा केल्या. 134 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 19.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. आफ्रिकन संघाच्या वतीने मार्कराम (52) आणि मिलर (59) यांनी शानदार खेळी करत सामना आफ्रिकन संघाच्या झोळीत टाकला. त्याचवेळी टीम इंडियाच्या या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले टीमची कुठे चुक झाली.

हेही वाचा: IND Vs SA T20 World Cup 2022 : माक्ररम - मिलर जोडी ठरली किलर; भारताचा वर्ल्डकपमध्ये 13 वर्षांनी केला पराभव

पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही फारसा नाराज नव्हता. रोहित म्हणाला की, 'खेळपट्टीत काहीतरी होईल अशी आम्हाला अपेक्षा होती. वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळेल हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे पाठलाग करणे सोपे नव्हते. आम्ही चांगली लढत दिली, पण आज दक्षिण आफ्रिकेने चांगली खेळली. जेव्हा तुम्ही स्कोअर पाहता (10 षटकात 40/3), तेव्हा तुम्हाला नेहमी वाटेल की तुम्ही गेममध्ये आहात. मार्कराम आणि मिलर यांच्यातील ही मॅच विनिंग पार्टनरशिप होती.

हेही वाचा: T20WC22 IND vs SA Analysis : भारत भागीदारी तोडण्यात अपयशी, क्षेत्ररक्षणही गचाळ

पुढे बोलताना रोहित म्हणाला, गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी केली. पण या सामन्यात आम्ही त्यांना संधी दिली, आम्ही काही धावबाद गमावले. शेवटच्या षटकात फिरकीपटूंचे काय होते ते मी पाहिले आहे, त्यामुळे मला दुसरीकडे जायचे होते. जर मी ऍशचे षटक पूर्ण केले असते, तर मला फक्त वेगवान गोलंदाज योग्य षटके टाकत आहेत याची खात्री करायची होती. तुम्हाला कधीतरी ते वापरावे लागेल.