RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Big relief for RCB fans before IPL 2026 : जाणून घ्या, कर्नाटक सरकारच्या गृह विभागाकडून याबाबत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला काय सांगितले गेले आहे?
Fans cheer as Chinnaswamy Stadium in Bengaluru receives official approval to host IPL and international cricket matches.

Fans cheer as Chinnaswamy Stadium in Bengaluru receives official approval to host IPL and international cricket matches.

esakal

Updated on

Major decision regarding Chinnaswamy Stadium : कर्नाटक सरकारच्या गृह विभागाकडून कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) ला बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. ही आयपीएल २०२६च्या आधी आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या समर्थकांना मिळालेली मोठी आनंदाची बातमी आहे.

केएससीएचे प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी सांगितले की, असोसिएशन सरकारने ठरवलेल्या सर्व अटी अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने अंमलात आणेल. केएससीएचे अध्यक्ष प्रसाद लवकरच पत्रकार परिषद घेऊन या मंजुरीशी संबंधित सर्व तपशील शेअर करण्याची अपेक्षा आहे.

केएससीएचे अध्यक्ष बी.के. वेंकटेश प्रसाद आयपीएल कर्नाटकात परत आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी सर्व सुरक्षा विषयक आणि प्रशासकीय चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठकाही घेतल्या आहेत.

Fans cheer as Chinnaswamy Stadium in Bengaluru receives official approval to host IPL and international cricket matches.
DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

एवढंच नाहीतर दोन दिवसांपूर्वीच आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर एआय-आधारित कॅमेरे बसवण्याची घोषणा केली होती. हे कॅमेरे प्रेक्षकांच्या हालचाली आणि गर्दीवर चांगले लक्ष ठेवणार आहेत. स्टेडियमच्या मंजुरीतील हा निर्णय एक प्रमुख घटक मानला जात आहे. मात्र तरीही काही अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण झाल्यानंतरच ही मंजुरी पूर्णपणे अंमलात आणली जाणार आहे.

Fans cheer as Chinnaswamy Stadium in Bengaluru receives official approval to host IPL and international cricket matches.
PF Withdrawal via UPI : ‘पीएफ’ खातेधारकांसाठी खुशखबर!, ‘UPI’ द्वारे पैसे काढण्याची तारीख आली समोर

या निर्णयानंतर आता मोठा प्रश्न असा आहे की, आगामी आयपीएल २०२६ मध्ये  आरसीबी त्यांचे सर्व घरच्या मैदानावरील सामने हे चिन्नास्वामी स्टेडियमवरच खेळेल की काही सामने अन्य ठिकाणीही आयोजित केले जातील. याबाबत फ्रँचायझी येत्या काही दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com