Josh Hazlewood IPL 2023 RCB : कांगारूंनी CSK नंतर आता RCB ला लावला घोर; आधी मॅक्सवेल अन् आता हेजलवूड...

Josh Hazlewood  IPL 2023 RCB
Josh Hazlewood IPL 2023 RCB esakal

Josh Hazlewood IPL 2023 RCB : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने नुकतेच लीग स्टेजच्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र यानंतर परदेशी खेळाडूंनी आयपीएल 2023 मधून एका पाठोपाठ एक माघार घेण्याचा सपाटाच लावला आहे. चेन्नईच्या बेन स्टोक्स आणि काईल जेमिसन यांच्या माघारीनंतर आता आरसीबीला देखील परदेशी खेळाडू ऐनवेळी टांग देण्याची शक्यता आहे.

Josh Hazlewood  IPL 2023 RCB
T20 WC INDW vs AUSW LIVE : कर्णधार हरमन फिट, संघासोबत कांगारूंना भिडणार; नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली

आरसीबीचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा दुखापतीमुळे काही आयपीएलचे सामने मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता आरसीबीचा अव्वल वेगवान गोलंदाज जॉस हेजलवूड देखील दुखापतीमुळे काही सामने मुकण्याची शक्यता आहे.

जॉस हेजलवूड हा भारताविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांना देखील मुकला आहे. तो आपल्या दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी मायदेशी परतला देखील आहे. त्यामुळे हेजलवूड आयपीएलच्या सुरूवातीला फिट होणार आहे की नाही याबाबत साशंकता आहे. आरसीबीचा पहिला सामना हा 2 एप्रिलला मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे.

Josh Hazlewood  IPL 2023 RCB
Sania Mirza : सानिया मिर्झाने जिंकलेला 'प्राईज मनी' पाहून डोळे विस्फारतील

हेजलवूड मायदेशी परतण्याबाबत म्हणाला की, 'हा एक वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग आहे. मला घोट्याच्या दुखापतीवर उपचार करायचे आहेत. मी मायदेशातील मालिकेत या दुखऱ्या घोट्यानेच गोलंदाजी करत होतो. त्यामुळे या दुखापतीतून पूर्णपणे सावरलो नव्हतो.'

Josh Hazlewood  IPL 2023 RCB
Virat Kohli Iceland Cricket : विराटला कसोटी शतकावरून डिवचले, फॅन्सनी आईसलँड क्रिकेटलाच घेतले फैलावर

हेजलवूड नसणं आरसीबीला पडू शतकं महागात?

  • हेजलवूड हा आरसीबीचा स्लॉग ओव्हरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज आहे.

  • आयपीएल 2022 च्या हंगामात हेजलवूडने 20 विकेट्स घेतल्या होत्या. तो हसरंगानंतरचा आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

  • हेजलवूड धावा देण्याच्या बाबतीतही फार किफायशीर आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये सामन्यावर नियंत्रण राखणे सोपे जाते.

  • आरसीबीच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व हेजलवूडच करत होता. तो पॉवर प्लेमध्ये संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

दरम्यान, आरसीबीला काही दिलासा देणारी बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलला भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. जर मॅक्सवेलने त्याचा फिटनेस तीन सामन्यांच्या मालिकेत सिद्ध केला तर तो आरसीबीकडून आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळू शकतो.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com