BCCI Sponsorship : रिलायन्सच्या Campa ने जिंकली बीसीसीआयची स्पॉन्सरशिप; कोका-कोला, पेप्सिकोची मक्तेदारी संपणार?

BCCI Sponsorship
BCCI Sponsorship esakal

BCCI Sponsorship Campa : कोको - कोला आणि पॅप्सिकोला शह देण्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन सॉफ्ट ड्रिंक येणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंच्युर्सची शाखा एफएमसीजी कॅम्पा हे सॉफ्ट ड्रिंक भारतीय बाजारात उतरवणार आहे. कॅम्पाने नुकतेच बीसीसीआयचा केंद्रीय स्पॉन्सरशिप जिंकली याबाबतेच अधिकृत ट्विट बीसीसीआयने प्रसिद्ध केलं आहे.

कॅम्पा सोबतच अॅटमबर्ग देखील बीसीसीआयचा भारतात होणाऱ्या सामन्यांसाठीचा स्पॉन्सर असणार आहे. ही डील 2024 ते 2026 अशा दोन वर्षासाठी असणार आहे. अॅटमबर्ग टेक्नॉलॉजी ही कंपनी होम अप्लायन्सेस तयार करणारी कंपनी असून तिने गेल्या काही वर्षात भारतात चांगला जम बसवला आहे.

BCCI Sponsorship
Mohammed Shami : ...म्हणून आपण पंतप्रधानांचे समर्थन केलं पाहिजे; अर्जुन पुरस्कार प्राप्त मोहम्मद शमी काय म्हणाला?

द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयसोबतची ही भागीदारी कॅम्पासाठी एक मोठा बूस्ट ठरू शकते. यामुळे मैदानावर कॅम्पाचा बोलबाला असणार आहे. मैदानावर भारताच्या सर्व सामन्यात सॉफ्ट ड्रिंक म्हणून फक्त कॅम्पा सर्व्ह केले जाणार. कॅम्पा लाँच होत असतानाच ही डील खिशात टाकल्यामुळे रिलायन्सच्या टायमिंग बाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत रिलायन्सने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कॅम्पाने ही डील फक्त पुरूष क्रिकेट संघाच्या सामन्यावेळी नाही तर भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी केली आहे. त्यामुळे 19 वर्षाखालील आणि महिला क्रिकेट संघाच्या भारतातील मालिकेत देखील कॅम्पाच असणार आहे.

BCCI Sponsorship
Pakistan : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटने उचलले मोठे पाऊल! तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी

कॅम्पाचा मास्टर स्ट्रोक?

भारतात क्रिकेट हा एका मोठ्या उत्सवासारखाच असतो. यामुळे ब्रँड्सना त्यांचे प्रमोशन करण्यासाठी एक मोठी संधी मिळते. रिलायन्सने कॅम्पा रिलाँच केल्यानंतर आता क्रिकेटची केंद्रीय स्पॉन्सरशिप मिळाल्यानंतर कोट्यावधी लोकांपर्यंत कॅम्पा सहजतेनं पोहचणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com