SA vs IND : ओल्या चेंडूवर देखील भारत लढला मात्र रिझाच्या खेळीमुळे रिंकूची झुंज गेली वाया

IND vs SA
IND vs SAesakal

outh Africa Vs India 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेने भारताचे 152 धावांचे आव्हान 13.3 षटकातच पार करत मालिकेतील दुसरा सामना जिंकला. याचबरोबर त्यांनी मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर कर्णधार एडिन माक्ररमने 30 धावांचे योगदान दिले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान आले. भारताकडून रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 धावांचे योगदान दिले होते.

IND vs SA
SA vs IND 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेने 13.3 षटकात पार केलं 152 धावांचे आव्हान

पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान आल्यानंतर सलामीवीर रिझा हेंड्रिक्सने धडाकेबाज फलंदाजी करत मॅथ्यू ब्रीड्झकीला (7 चेंडूत 16 धावा) सोबत घेत 3 षटकातच 42 धावा धावफलकावर लावल्या.

यानंतर रिझाने कर्णधार एडिन माक्ररम सोबत अर्धशतकी भागीदारी रचत 8 षटकात 96 धावांपर्यंत पोहचवले. माक्ररम 17 चेंडूत 30 धावा केल्या. दरम्यान रिझा हेंड्रिक्सने 27 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावने हुकले.

रिझाला कुलदीप यादवने बाद केलं. मात्र रिझा जरी बाद झाला असला तरी आफ्रिकेला 36 चेंडूत फक्त 44 धावांची गरज होती. हेन्री क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्यावर मदार होती. मात्र मोहम्मद सिराजने क्लासेनला 7 धावांवर बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला.

क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने क्रिस्टन स्टब्जच्या साथीने सामना 18 चेंडूत 24 धावा असा जवळ आणला होता. 13 वे षटक टाकणाऱ्या मुकेश कुमारने 12 धावा देत महत्वाची मिलरची विकेट मिळवली.

आता 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना जडेजाच्या 14 व्या षटकात स्टब्ज आणि फुलकवायो यांनी 14 धावा ठोकत सामना 5 विकेट्सनी जिंकला.

IND vs SA
Surya Kumar Yadav : धोनीलाही टाकलं मागं; कर्णधार सूर्यानं रोहितलाही जे जमलं नाही ते करून दाखवलं

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्या. मात्र शेवटचे तीन चेंडू शिल्लक असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारताचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. पाऊस थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आलं.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने भारताचे दोन्ही सलामीवीर 6 धावात गार केले. मात्र त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी कर 49 धावांची भागीदारी रचली. पॉवर प्लेमध्येच 55 धावांपर्यंत मजल मारून दिली.

वर्मा 29 धावा करून बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत रिंकू सिंहसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. मात्र सूर्या 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिंकूने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत भारताकडून आपले पहिले वहिले टी 20 अर्धशतक ठोकले. त्याने 39 चेंडूत नाबाद 68 धावा करत भारताला 19.3 षटकात 180 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com