
धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 90 कसोटीतील 144 डावांत त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. याचदरम्यान त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.
चेन्नई- ऑस्ट्रेलियामधील मालिका विजयाचा हिरो विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंत सुरुवातीपासून एमएस धोनीचा उत्तराधिकारी मानला जातो. क्रिकेट रसिक त्याच्या आक्रमक फलंदाजीचे चाहते आहेत. परंतु, विकेटकिपिंगमध्ये त्याच्या उणिवा मात्र दिसून येतात. तरीही पंतने आपल्या छोट्या करिअरमध्ये असे अनेक पराक्रमावर आपले नाव कोरले आहेत जे धोनीलाही विकेटकिपर बॅट्समन म्हणून आपल्या करिअरमध्ये करता आले नव्हते.
कसोटी रँकिंगमध्ये 13 व्या स्थानी पोहोचला पंत
बुधवारी रिषभ पंतने एक नवी कामगिरी केली. इंग्लंडविरोधात चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात 91 धावांची खेळी करुन त्याने टीमला संकटातून बाहेर काढले. परंतु, दुसऱ्या डावात त्याला 11 धावांचीच खेळी करता आली. त्यामुळे त्याला टीमला पराभवापासून वाचवता आले नाही. पहिल्या डावात खेळलेल्या अर्धशतकीय खेळीमुळे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये त्याची कामगिरी सुधारली. तो 703 रेटिंग पाँईट्सबरोबर 13 व्या स्थानी पोहोचला. त्याची ही सर्वोच्च रँकिंग आहे.
हेही वाचा- भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार 'डीएसपी'
700 रेटिंग पाँईंट्स मिळवणारा पहिला फुलटाइम विकेटकिपर
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 700 हून अधिक रेटिंग पाँईंट मिळवणारा भारताचा तो पहिला फुलटाइम विकेटकिपर फलंदाज ठरला आहे. पंतने हा पराक्रम आपल्या छोट्या कसोटी करिअरमध्ये केला आहे. त्याची केवळ 17 वी कसोटी होती. वर्ष 2018 मध्ये पंतने इंग्लंडविरोधात नॉटिंगहममध्ये कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या 17 कसोटीतील 29 डावांमध्ये 44.07 च्या सरासरीने 1190 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 2 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची दोन्ही शतके विदेशात झळकली आहेत.
धोनी टेस्ट रँकिंगमध्ये 20 व्या स्थानापर्यंत पोहोचला
धोनीने वनडेमध्ये तर जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये 90 कसोटीतील 144 डावांत त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. याचदरम्यान त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. धोनीने आपल्या करिअरमध्ये कसोटी रँकिंगमध्ये 20 व्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. ही रँकिंग त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये मिळवली होती. धोनीने कसोटी करिअरमध्ये सर्वाधिक 662 रेटिंग पाँईंट मिळवले आहेत.