IND vs BAN : ऋषभ पंतने घेतली झोपेची गोळी? माजी दिग्गज खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

rishabh pant take sleeping pill India vs Bangladesh 2nd Test
rishabh pant take sleeping pill India vs Bangladesh 2nd Testsakal

India vs Bangladesh 2nd Test: भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणारा ढाका कसोटी सामना आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. या सामन्यात बांगलादेशने 145 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 45 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 100 धावांची गरज आहे. तर अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावांवर नाबाद आहे, जो दिवसाची सुरुवात करेल. दोघेही नाईट वॉचमन म्हणून उतरले होते. या सामन्यात अक्षरला विराट कोहलीच्या आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, त्यावरून सर्वत्र टीका होत आहे.

rishabh pant take sleeping pill India vs Bangladesh 2nd Test
IND vs BAN: कोहलीसाठी अत्यंत वाईट दिवस! आधी सोडले चार झेल नंतर केली शिवीगाळ...

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि अजय जडेजा यांनीही संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली आहे. दोघांनी कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर जोरदार टीका केली. जडेजाने तर असे म्हटले की डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनासाठी असे केले असेल तर ऋषभ पंत झोपेच्या गोळ्या घेऊन झोपला होता का ?.

rishabh pant take sleeping pill India vs Bangladesh 2nd Test
Year Ender 2022 : सिंधूने इतिहास रचला; Forbes च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या यादीत मानाचे स्थान

गावसकर आणि जडेजा ब्रॉडकास्टर सोनी स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री पॅनलवर आहेत. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गावसकर म्हणाले की, कोहलीचा चांगला संदेश गेला नाही. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. कोहलीने स्वत: असे करण्यास सांगितले असले तरी ती वेगळी बाब आहे. चेंजिंग रूममध्ये काय झाले ते आम्हाला माहित नाही. पण समजणे अवघड आहे. अक्षर चांगला खेळतो यात शंका नाही. दरम्यान, जडेजा म्हणाला की, तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. फक्त 15 षटके शिल्लक होती. लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनसाठी हे केले असावे, असे सबा करीमने म्हटले होते. ही विचारसरणी ठीक आहे, पण मला वाटतं तेव्हा ऋषभ पंतने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या?

गावसकर म्हणाले, 'तो डाव्या हाताचा फलंदाज असो वा नसो, पण आता ऋषभ पंतला येऊ दिले पाहिजे होते. अक्षर पटेल जरी क्रीजवर असला तरी पंतला मैदानात येण्याची परवानगी द्यावी. आता डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा हा प्रयोग थांबायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com