esakal | "२४ तास मास्क लावणं निव्वळ अशक्य"; 'दादा'कडून पंतची पाठराखण
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav Ganguly

"२४ तास मास्क लावणं निव्वळ अशक्य"; 'दादा'कडून पंतची पाठराखण

sakal_logo
By
विराज भागवत

पंतला कोरोनाची लागण झाल्याने तो मित्राच्या घरी होम क्वारंटाईन

लंडन: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे खेळाडू सुट्टी एन्जॉय करत होते. १५ जुलैपर्यंत त्यांची सुट्टी होती. याचदरम्यान, युरो कप फुटबॉलचे सामने पाहायला गेलेल्या ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली. तो मास्क न घालता सामना पाहायला स्टेडियममध्ये गेल्याचा फोटो व्हायरल झाला आणि त्यावरून त्याच्यावर टीकेचा वर्षाव झाला. पण, सुट्टीच्या वेळी २४ तास मास्क घालणं निव्वळ अशक्य आहे, अशा शब्दात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने पंतची पाठराखण केली. (Rishabh Pant tested positive for Covid 19 BCCI Chief Sourav Ganguly defends his mask-less appearance in Football match vjb 91)

हेही वाचा: "मुलींनो, सामना जिंकायचा असेल तर..."; कोच पोवार यांचा कानमंत्र

"ऋषभ पंत आणि इतर सर्वच खेळाडू विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर सुट्टीवर होते. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्या पराभवातून बाहेर येण्यासाठी त्यांनी बाहेर डोकं शांत करणं गरजेचं होतं. त्या सर्वांनी सुट्टीत चांगला वेळ घालवला. आपण साऱ्यांनीच युरो कप चॅम्पियनशीप आणि विम्बल्डन स्पर्धा पाहिल्या आहेत. आता इंग्लंडमधील कायम नियम बदलले आहेत. ठिकठिकाणी स्टेडियमच्या आत लोकांना मास्कशिवाय येण्यास परवानगी आहे. खेळाडूंना सुट्टी होती आणि खरं सांगायचं तर २४ तास मास्क घालून राहणं हे निव्वळ अशक्य आहे", अशा शब्दात गांगुलीने पंतची पाठराखण केली.

हेही वाचा: Tokyo Olympics: सिंधूने मानले कोरोनाचे आभार; जाणून घ्या कारण

इंग्लंडमध्ये असलेल्या टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे असे BCCIने सुरूवातीला सांगितले होते. मात्र, BCCIने खेळाडूचे नाव जाहीर केले नव्हते. पण तसे असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, तो खेळाडू ऋषभ पंतच होता. संध्याकाळपर्यंत पंतचे नाव बरोबर ठरले. त्याचसोबत नेट्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या एकालाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे १५ जुलैला लंडनहून डुरहॅमला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता. टाइम्सनाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पंतला ८ दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून तो लंडनमधील त्याच्या एका मित्राच्या घरी होम क्वारंटाइन झाला. तो कोरोनातून पूर्णपणे बरा झाला की मगच डुरहॅमला रवाना होऊन इतर खेळाडूंसोबत संघात दाखल होणार आहे.

loading image