
Rohit Pawar News : रोहित पवारांनी घेतली जय शहांची भेट; केलं तोंडभरून कौतुक
आज महिला IPL साठी महत्वाचा दिवस होता, कारण आज बीसीसीआयला 5 संघांसाठी फ्रेंचायजी मिळाले आहेत. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार या संघांच्या लिलावातून बीसीसीआयला 4 हजार 669 कोटी रूपयांची कमाई झाली आहे.
यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी जय शहा यांची भेट घेतली. याबद्दल पोस्ट करत शहा यांचे तोंडभरून कौतुक देखील केलं आहे.
महिला क्रिकटेला मिळालेल्या मोठ्या व्यासपीठाबद्दल रोहित पवारांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. BCCI चे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार आशिष शेलार जी यांची भेट घेऊन क्रिकेट संदर्भात चर्चा केली तसेच आज Bcci तर्फे महिला IPL संघासाठीचा लिलाव चांगल्या पद्धतीने झाल्याने सर्वांचे अभिनंदन केले.
तसेच महिलांना IPL सारखं मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं याचा आनंद आहे असेही रोहीत पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
हेही वाचा: "देवेंद्रजी आपसे ये उम्मीद न थी"; सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांना करून दिली कर्तव्याची आठवण
दरम्यान बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार महिला आयपीएलसाठी अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौ या शहरांची निवड करण्यात आली होती. अहमदाबादचा संघ अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड यांनी तब्बल 1289 कोटी रूपयांना खरेदी केला. तर मुंबईचा संघ इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 912.99 कोटी रूपयांना खरेदी केली आहे.
हेही वाचा: Women's IPL : 5 संघांसाठी बीसीसीआयला मिळाले फ्रेंचायजी; कमावला 4669.99 कोटींचा गल्ला
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पुरूषांप्रमाणे महिला आयपीएलमध्ये बंगळुरूचा संघ खरेदी केला. त्यासाठी त्यांनी 901 कोटी रूपये खर्च केले. यानंतर दिल्लीचा संघ देखील JSW GMR ने 810 कोटी रूपये खर्चून आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. लखनौचा संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने 757 कोटी रूपयांना खरेदी केला.