Rohit Sharma VIDEO : भारताच्या कर्णधारानं अंपायरला बायसेप्स दाखवले, रोहितनं सांगितलं नेमकं काय घडलं

Rohit Sharma VIDEO
Rohit Sharma VIDEO esakal

Rohit Sharma VIDEO : भारत आणि पाकिस्तान सामना असेल तर रोहित शर्माची बॅट तळपतेच. पाकिस्तान विरूद्धच्या गेल्या 8 वनडे सामन्यात रोहित शर्माने दोन शतकी आणि चार अर्धशतकी खेळी केल्या आहेत. वर्ल्डकप 2023 च्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात देखील रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.

रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची दमदार खेळी केली. त्यात 6 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. या धडाकेबाज खेळीनंतर रोहित शर्मा आणि अंपायर इरास्मस यांच्यात एक छोटेखानी संभाषण झालं. त्यावेळी रोहित शर्माने इरास्मस यांना आपल्या दंडाची बेडकी दाखवली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. अखेर रोहितने अंपायरला दंडाची बेडकी दा दाखवली याचा उलगडा पांड्याशी बोलताना केला.

Rohit Sharma VIDEO
Argentina Cricket Team : मेस्सीच्या अर्जंटिनाने केला क्रिकेटमध्ये विश्वविक्रम; बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

भारतीय संघ पाकिस्तानविरूद्धचा विजय साजरा करत असताना हार्दिक पांड्याने रोहित शर्माला अंपायरला बायसेप्स दाखवण्याबद्दल विचारले. त्यावेळी रोहित शर्माने मैदानावर त्यावेळी काय झाले याचा उलगडा केला. रोहित म्हणाला, 'ते मला विचारत होते की तू एवढ्या लांब षटकार कसा मारतो, तुझ्या बॅटमध्ये काहीतरी आहे. मी त्यांना म्हणालो की बॅटमध्ये काही नाही ही तर ताकद आहे.'

Rohit Sharma VIDEO
Wasim Akram : तुझ्या काकाच्या मुलाला जर... बाबरने विराटची स्वाक्षरी घेतली अन् अक्रमची सटकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com