
अहमदाबाद: भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा (India vs West Indies) दुसरा सामना 44 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पूर्णवेळ वनडे कर्णधार झाल्यापासून पहिलीच मालिका होती आणि भारतीय संघ ती मालिका व्हाईट वॉश देऊन जिंकण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात काही बदल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. रोहित शर्माने केएल राहुल (KL Rahul) सोबत सलामीला येणाऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबत सलामी दिली.
रोहितने नाणेफेक हरल्यानंतर सर्वानांच एक मोठा धक्का दिला. रोहितने ऋषभ पंत सोबत सलामी दिली (Rishabh Pant Opening The Inning). हा बदल दुसरा सलामीवीर केएल राहुल संघात असताना करण्यात आला. मात्र हा बदल भारतीय संघाला फारसा मानवला नाही. ऋषभ पंत 34 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. दरम्यान, या बदलाबाबत कर्णधार रोहित शर्माला सामना संपल्यानंतर प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर रोहित म्हणाला की, 'मला काही वगेळ्या गोष्टी करण्यास सांगितले होते. ही वेगळीच गोष्ट होती. ऋषभ पंतने सलामी देणे लोकांना आवडले असेल. पण हो हे कायमस्वरूपी नाही.' रोहित पुढे म्हणाला की, 'शिखर धवन (Shikhar Dhawan) पुढच्या सामन्यात संघात परतेल. त्यालाही सामन्याचा सराव गरजेचा आहे. प्रत्येक वेळी निकाल महत्वाचा नसतो. आपण एका सामन्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी वेगळं करताना एखादा सामना आम्ही गमावला तरी त्याची फारशी चिंता आम्ही करत नाही. कारण हे भविष्यातील उद्येशांसाठी महत्वाचे आहे. आम्ही कोणती कॉम्बिनेशन चालू शकतील याची पडताळणी करत आहोत.'
भारताने दुसऱ्या वनडे प्रथम फलंदाजी करताना सामन्यात 9 बाद 237 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने वेस्ट इंडीजला 46 षटकात 193 धावात गुंडाळत सामना 44 धावांनी जिंकला. आता भारताकडे 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. त्यामुळे उद्या 11 फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारताला संघात काही बदल करून विविध कॉम्बिनेशन पडताळून पाहता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.