Virat Kohli : विराट इंदौरला निघालेल्या टीम सोबत प्रवास करत नाहीये; काय आहे कराण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli hasn't travelled with Team For Indore

Virat Kohli : विराट इंदौरला निघालेल्या टीम सोबत प्रवास करत नाहीये; काय आहे कराण?

Virat Kohli India Vs South Africa 3rd T20I : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात टाकली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसरा टी 20 सामना हा 4 ऑक्टोबरला इंदौर येथे होणार आहे. या सामन्यात भारताच्या काही महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा देखील समावेश असू शकतो. काही वृत्तानुसार विराट कोहली टीम इंडियासोबत इंदौरला गेलेला नाही.

हेही वाचा: Women's Asia Cup T20 : भारताचा 181 धावा करूनही मलेशियाविरूद्ध 30 धावांनी विजय

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची टी 20 संघातील जागा धोक्यात असल्याचे मानले जात होते. आता एका महिन्याच्या विश्रांतीनंतर त्याने टीम इंडियात झोकात पुनरागमन केले. आशिया कपमध्ये त्याने बहुप्रतिक्षित 71 वे शतक ठोकले. त्यानंतर आता त्याच्या संघातील स्थान मजबूत झाले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत देखील आपला चांगला फॉर्म दाखवून दिला. दरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या टी 20 सामन्यात विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.'

हेही वाचा: PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला?

विराट कोहली निघाला मुंबईला

मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली हा 3 ऑक्टोबरला इंदौरला नाही तर मुंबईला रवाना होत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. तो मुंबईतच संघासोबत जोडला जाईल. भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तेथे संघ ब्रिसबेनमध्ये काही सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडेल.