Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाला निघण्यापूर्वी रोहित शर्मा सिद्धीविनायकाच्या चरणी

Rohit Sharma Visited Shree Siddhivinayak Ganpati Temple
Rohit Sharma Visited Shree Siddhivinayak Ganpati Temple esakal

Rohit Sharma Visited Siddhivinayak Temple : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2022 साठी गुरूवारी (दि. 6 ) सकाळी रवाना झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरूद्ध खेळून आपल्या वर्ल्डकप मिशनला सुरूवात करणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेला होता.

Rohit Sharma Visited Shree Siddhivinayak Ganpati Temple
Sandeep Lamichhane : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या लामिछानेला अखेर अटक

रोहित शर्माने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रभादेवी येथील सिद्धीविनायकाचा आशीर्वाद घेतला. यावेळी रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समैरा देखील होत्या. दरम्यान, रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला निघण्यापूर्वी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्याचे मंदिराचे सीईओ नंदा राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाल्या, 'दसऱ्यादिवशी बुधवारी रोहित शर्माने सिद्धीविनायकाच्या मंदिराला भेट दिली होती. तो आपली पत्नी आणि मुलीसोबत दर्शनासाठी आला होता. तो दर्शनासाठी येणार आहे याची आधी कल्पना देण्यात आली नव्हती. मात्र आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोहित शर्माला पाहिल्यानंतर त्याला मंदिरापर्यंत व्यवस्थित जेण्यासाठी मदत केली. तो मंदिरात जवळपास 10 मिनिटे होता.'

नंदा राऊत यांनी सांगितले की, 'रोहित शर्माने श्रीगणेशाचे व्यवस्थित दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यांनी रोहितला हार आणि प्रसादाचा नारळ दिला. आम्ही आशा करतो की भारतीय संघ वर्ल्डकप घेऊनच मायदेशात परतेल.'

Rohit Sharma Visited Shree Siddhivinayak Ganpati Temple
Gautam Gambhir : लखनौ सुपर जायंटच्या RPSG Group ने गंभीरला दिली 'ग्लोबल' जबाबदारी

रोहित शर्माची कर्णधार म्हणून पहिलीच ICC स्पर्धा

रोहित शर्मा पहिल्यांदाच ICC स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहितने यापूर्वी देखील मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे. 2018 च्या निधास ट्रायसिरीजमध्ये भारताने विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये भारताला आपले विजेतेपद टिकवता आले नव्हते. भारतीय संघ सुपर 4 मध्येच गारद झाला होता. भारताचा पाकिस्तान आणि श्रीलंकेने पराभव केला. आता भारत पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये भिडणार आहे. यावेळी गेल्या टी 20 वर्ल्डकपमधील पराभवचा वचपा काढण्याची भारताला संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com