Ruturaj Gaikwad : चैन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन होतो का? ऋतुराजनं दिलं भन्नाट उत्तर!

आयपीएलमध्ये ऋतुराजनं केलेल्या स्फोटक फलंदाजीनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले आहे.
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwadesakal

Ruturaj Gaikwad chennai Super king will be captain : चैन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराजनं काल जी तुफान बँटिंग केली त्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहेत. यापूर्वी देखील त्यानं प्रभावी कामगिरी करुन नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर ऋतुराजवर खास मीम्स देखील व्हायरल झाले आहे. आयपीएलमध्ये ऋतुराजनं केलेल्या स्फोटक फलंदाजीनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले आहे.

कालचा सामना संपला आणि सुरेश रैना, रॉबिन उथप्पानं ऋतुराजला बोलावून घेतले. त्याच्याशी संवाद साधताना रैनानं त्याला विचारलेल्या प्रश्नानं ऋतुराज जरासा भांबावून गेला. पण जोरदार बँटिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ऋतुराजनं त्या प्रश्नाचा यॉर्कर मोठ्या खुबीनं उडवून लावला आहे. सोशल मीडियावर ऋतुराज तर लाईमलाईट मध्ये आला आहे. त्याच्यावर तरुणाईचा कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

Also Read : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Cureency करकक्षेत

लखनो जायंटस् विरोधात चैन्नईनं धावांचा डोंगर उभारला. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत संघाला मोठी धावसंख्या उभारली. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो ऋतुराजच्या खेळीचा. त्यानं ५७ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलं. ऋतुराजनं सहा चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली होती. त्याच्या या खेळीनं चाहते खुश झाले होते. नेटकऱ्यांनी तर त्याच्यावर वेगवेगळे मीम्स तयार करुन त्याच्या खेळीवर कौतूकाचा वर्षाव केला होता.

यासगळ्यात चैन्नईच्या मोईन अलीनं चार विकेट घेत लखनौ जायटंसला मोठा धक्का दिला होता. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. चाहत्यांना अंदाज होता की, ऋतुराजला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात येईल. पण तसे काही झाले नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा सुरेश रैनानं त्याला त्याच्या खेळीविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, माझ्या खेळीपेक्षा माहीनं जे दोन सिक्स लगावले ते अविस्मरणीय होते.

तुला चैन्नईचा कॅप्टन व्हायला आवडेल का? असे विचारल्यावर तो म्हणाला, मला माहीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल. अजुन कुठलाही विचार केलेला नाही. धोनीनं एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे, भविष्यापेक्षा आज आणि आता काय आहे त्यावर फोकस करा. ते जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे त्यावेळी ठरवता येईल. अशा शब्दांत ऋतुराजनं उत्तर दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com