Sa vs Ind : शुभमन गिलमुळे 'या' दोन खेळाडूंवर टांगती तलवार; कोणाचा पत्ता होणार कट?

Sa vs Ind 2nd T20 Team India Playing 1
Sa vs Ind 2nd T20 Team India Playing 1sakal

Sa vs Ind 2nd T20 Team India Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज गकेबेरहा शहरातील सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पावसामुळे डरबनच्या किंग्समीड मैदानावर मालिकेतील पहिला सामना होऊ शकला नाही.

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल या मालिकेतून टी-20 संघात पुनरागमन करणार आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेचा भाग नव्हता. अशा स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव नव्या सलामीच्या जोडीसह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरू शकतो.

Sa vs Ind 2nd T20 Team India Playing 1
Sa Vs Ind : भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका जाणार पाण्यात? दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट

संघाचा नियमित सलामीवीर शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवची डोकेदुखी वाढली आहे. कारण शुभमन गिलसोबत सलामीसाठी संघात सध्या दोन मोठे दावेदार आहेत. गिल यांच्यासह यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड यांच्या पैकी कुणाला तरी संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत या दोन्ही खेळाडूंनी सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली होती.

Sa vs Ind 2nd T20 Team India Playing 1
Yuvraj Singh 6 Six : युवराज सिंग म्हटलं की आठवतात '6 बॉल 6 सिक्स'; पाहा ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ

दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवली ताकद

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋतुराज गायकवाडने 5 डावात 55.75 च्या सरासरीने 223 धावा केल्या. या काळात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले. त्याचवेळी यशस्वी जैस्वालने 5 डावात 27.60 च्या सरासरीने 138 धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती. या मालिकेत त्याने 1 अर्धशतकही झळकावले.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा (उपकर्णधार). कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com