AUS vs WI Sachin Tendulkar : हा क्रिकेट फॉरमॅट परीक्षा पाहतो... सचिनने 24 वर्षाच्या शामर जोसेफचं केलं कौतुक

Sachin Tendulkar On Shamar Joseph : जोसेफ वेस्ट इंडीजच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार
AUS vs WI Sachin Tendulkar
AUS vs WI Sachin Tendulkaresakal

West Indies Defeat Australia : वेस्ट इंडीजने गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करत इतिहास रचला. तब्बल 27 वर्षांनी वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध गाबामध्ये कसोटी विजय मिळवला आहे. या विजयात वेस्ट इंडीजचा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने सिंहाचा वाटा उचलला. त्याने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज 68 धावा देत गारद देले. (Sachin Tendulkar praise on Shamar Joseph)

AUS vs WI Sachin Tendulkar
Ind vs Eng Live Score 1st Test Day 4: रविंद्र जडेजा झाला धावबाद; भारत पराभवाच्या छायेत

वेस्ट इंडीजच्या या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे जगभरातून कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील ट्विट केले. सचिन तेंडुलकर जोसेफचे कौतुक करत म्हणाला, 'शामर जोसेफची दमदार गोलंदाजी. त्याच्या 7 विकेट्स या दृढनिश्चय आणि कसोटी क्रिकेटमधील रंजकता याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. हा असा क्रिकेट फॉरमॅट आहे जो खेळाडूची परीक्षा पाहतो आणि त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याची संधी देतं. ऑस्ट्रेलियात 27 वर्षानंतरच्या वेस्ट इंडीजच्या विजयाचा शिल्पकार.'

AUS vs WI Sachin Tendulkar
AUS vs WI : एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे ब्रायन लाराच्या डोळ्यात अश्रू... कांगारूंवर वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय

वेस्ट इंडीजकडून वेगवान गोलंदाज शामर जोसेफने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे 24 वर्षाचा हा गोलंदाज आपली दुसरीच कसोटी खेळत होता. जोसेफला सामनावीर आणि मालिाकवीराचा देखील पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात त्याचा पायाचा अंगठा दुखावला होता. फलंदाजी करताना त्याला मैदान देखील सोडावे लागले होते. मात्र तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला अन् त्यानं विंडीजच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला. 

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com