World Cup 2023: इंग्लंडच्या पराभवानंतर सचिनने केलं अनॅलिसिस, सांगितले इंग्लिश संघाने कुठे खाल्ली माती

England vs Afghanistan World Cup 2023
England vs Afghanistan World Cup 2023 sakal

England vs Afghanistan World Cup 2023 : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने 15 ऑक्टोबरचा दिवस एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये स्वतःसाठी संस्मरणीय बनवला. दिल्लीच्या मैदानावर गतविजेत्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसरा विजय नोंदवला. 285 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ या सामन्यात 215 धावा करू शकला. या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने इंग्लंड संघाच्या पराभवाचे मुख्य कारण सांगतानाच या ऐतिहासिक विजयाबद्दल अफगाणिस्तान संघाचे अभिनंदनही केले.

England vs Afghanistan World Cup 2023
World Cup 2023 : वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतीक्षा संपणार! MS धोनीच्या 2011च्या संघात अन् रोहित शर्माच्या 2023 च्या संघात 4 साम्य

या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे फिरकी गोलंदाज. त्यांच्या तीन गोलंदाजांनी मिळून एकूण 8 विकेट घेतल्या. या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले, उत्कृष्ट फिरकी आक्रमण खेळण्यासाठी तुम्हाला त्यांच्या हातातील चेंडू समजून घ्यावा लागतो, परंतु इंग्लंडचे फलंदाज चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. अफगाणिस्तान संघाने मैदानावर जबरदस्त ऊर्जा दाखवली आणि या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन.

सचिन तेंडुलकरशिवाय भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही या सामन्यानंतर ट्विट केले की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी टॉप-4 मध्ये पोहोचणे कठीण आहे. इंग्‍लंडच्‍या टीमने आत्तापर्यंत 3 पैकी केवळ एकच मॅच जिंकली आहे, तर 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्‍या आस्‍ट्रेलियाला आतापर्यंत खेळल्‍या 2 मॅचमध्‍ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com