World Cup 2023 : वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतीक्षा संपणार! MS धोनीच्या 2011च्या संघात अन् रोहित शर्माच्या 2023 च्या संघात 4 साम्य

world cup 2023
world cup 2023

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले तीनही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये हा संघ 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे.

टीम इंडियाने 2011 मध्ये घरच्या मैदानावर शेवटचे वर्ल्डकप जिंकले होते, जेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. यावेळीही आयसीसी स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. 2011 आणि 2023 च्या संघांमध्ये 5 समानता दृश्यमान आहेत. अशा परिस्थितीत संघाची वर्ल्ड कप जिंकण्याची 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला 19 ऑक्टोबरला त्यांचा चौथ्या सामना बांगलादेशविरुद्ध खेळयचा आहे.

world cup 2023
World Cup 2023 : जग जिंकणाऱ्या टीमला झटका! वर्ल्डकप मधील 10 शॉकिंग निकाल... भारताला सुद्धा बसलाय दणका

पहिले तीन सामने हारले नाही....!

2011 बद्दल बोलायचे तर, टीम इंडियाने पहिले तीन सामने हारले नव्हते. इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता, तर भारताने बांगलादेश आणि नेदरलँडविरुद्ध विजय मिळवला होता. 2023 मध्येही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ एकही सामना हारला नाही. संघाने लक्ष्याचा पाठलाग करत तिन्ही सामने जिंकले आहेत.

सचिनप्रमाणे रोहितची मोठी खेळी...!

2011 मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना टाय झाला होता. त्या सामन्यात सलामीवीर फलंदाज सचिन तेंडुलकरने शतक झळकावले होते. वेगवान गोलंदाज झहीर खानने 3 विकेट घेतल्या होत्या. 2023 बद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकेले, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या.

world cup 2023
World Cup Points Table : अफगाणिस्तानचा विजय अन् पॉइंट टेबल मध्ये मोठी उलथापालथ! संकटात सापडले इंग्रज अन् कांगारू

युवराजसारखी अय्यरने दाखवली ताकद

2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला होता. युवराज सिंगने अर्धशतक झळकावले होते. 2023 मध्ये संघाने तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतके झळकावली. सामनावीर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या होत्या.

रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्यावर जबाबदारी

अष्टपैलू युवराज सिंग 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये सामनावीर ठरला होता. युवराजने 362 धावा करण्यासोबतच गोलंदाजीत 15 विकेट्सही घेतल्या होत्या. 2023 बद्दल बोलायचे तर, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्यावर जबाबदारी आहे. जडेजाला अद्याप फलंदाजीची संधी मिळालेली नाही. गोलंदाज म्हणून त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. तर हार्दिक पांड्यानेही 5 विकेट्स घेतल्या आहेत.

सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल सांगायचे तर, रोहित शर्माने एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक 217 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 2 अर्धशतकांसह 156 धावा केल्या आहेत तर केएल राहुलने एका अर्धशतकाच्या मदतीने 116 धावा केल्या आहेत.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तिघांनीही 5-5 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com