Sachin Tendulkar: 'तू कधीच तंबाखूची जाहिरात करू नको...' सोळाव्या वर्षी वडिलांनी माझ्याकडून घेतले होते वचन

Sachin Tendulkar Smile Ambassador
Sachin Tendulkar Smile Ambassador

Sachin Tendulkar Smile Ambassador : मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत.

राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली.

याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत.

Sachin Tendulkar Smile Ambassador
Gud बाय लिजंड! CSKच्या दिग्गज खेळाडूने भरल्या डोळ्यांनी केला क्रिकेटला अलविदा

या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकर यांनी एक किस्सा सांगितला. 'तो म्हणतो, मला अजूनही आठवतंय मी शाळेत असताना किंवा मैदानात आपले गुरु आपल्या सेकंड पेरेंट असतात. पण दुर्दैवाने बरेच शिक्षक गुटखा आणि तंबाखू खातात.

लहान मुलं मुली त्यांना बघतात मग कुठे ना कुठे त्यांना पण वाटते की आपण पण ट्राय करावा आणि खातात. त्याचा परिणाम इतका खराब होतो की तोंडाचा कॅन्सर होतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मित्रांना मैत्रिणीला वगैरे सर्वांना त्रास होतो'.

सचिन पुढे बोलताना म्हणाला की, 'मी 16 व्या वर्षे भारतीय संघात खेळलो. त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्याकडून वचन घेतले की तू कधीच तंबाखूचे जाहिरात करणार नाही'.

Sachin Tendulkar Smile Ambassador
Hardik Pandya: 'मी धोनीसाठी...' पराभवानंतर हार्दिक पांड्याने केलं मोठं विधान; क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण

वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com