Gud बाय लिजंड! CSKच्या दिग्गज खेळाडूने भरल्या डोळ्यांनी केला क्रिकेटला अलविदा

शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला अन् भरल्या डोळ्यांनी क्रिकेटला अलविदा केला
 Ambati Rayudu
Ambati Rayudu

CSK vs GT IPL 2023 Ambati Rayudu Emotional : चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आहे. मात्र अनुभवी खेळाडूचा हा शेवटचा सामना होता. होय सीएसकेचा फलंदाज अंबाती रायडूने रविवारी 28 मे रोजीच घोषणा केली होती. आयपीएल 2023चा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना असेल.

मात्र, त्या दिवशी सामना झाला नाही, त्यामुळे राखीव दिवशी शेवटचा सामना खेळून त्याने शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भरल्या डोळ्यांनी त्याने क्रिकेटला अलविदा केला आणि यासोबत रोहित शर्माच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

 Ambati Rayudu
Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; 'आमच्यात दडलेलं ते लहान मुल तुला चषक...'

आयपीएलच्या इतिहासात खेळाडू म्हणून सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा अंबाती रायडू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितने खेळाडू आणि कर्णधार म्हणून 6 वेळा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आहे, तर अंबाती रायडूनेही सहाव्यांदा हा पराक्रम केला आहे. रायुडूने सीएसकेकडून तीन वेळा आणि मुंबई इंडियन्सकडून तीन वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

 Ambati Rayudu
IPL 2023 Prize Money: चॅम्पियन चेन्नई झाली मालामाल! हरल्यानंतरही GTला मिळाले कोटी; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

उजव्या हाताचा फलंदाज अंबाती रायडूने आयपीएल 2023 च्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात फक्त 8 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले आणि एकूण 19 धावा केल्या. रायुडूचा स्ट्राईक रेट 237.50 होता. सीएसके कॅम्पला त्याच्याकडून अशीच अपेक्षा होती आणि अंबाती रायडूने त्याच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात तेच केले.

विजेतेपदानंतर रायुडू म्हणाला, 'हे अविश्वसनीय आहे, खरोखर भाग्यवान आहे की हा विजेतेपदाचा सामना महान संघांमध्ये खेळला गेला. हा विजय मी उर्वरित काळासाठी लक्षात ठेवेन. माझे आयुष्य, गेल्या 30 वर्षात खूप कष्ट केले, त्याचा शेवट करताना आनंद झाला. मी माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या वडिलांचे आभार मानण्यासाठी हा क्षण घेऊ इच्छितो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com