Video: सचिन तेंडुलकर प्रजासत्ताक दिनी कोणत्या अधिकाराबद्दल बोलतोय?

Sachin Tendulkar Talked About Right to Play On The Occasion Of 73rd Republic Day
Sachin Tendulkar Talked About Right to Play On The Occasion Of 73rd Republic Day esakal

मुंबई : भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (73rd Republic Day 2022) अनेक सेलिब्रेटी आणि आजी माजी खेळाडूंनी भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचबरोबर सचिन तेंडुलकरने खळेण्याचा अधिकार (Right to Play) हा मद्दा छेडला.

Sachin Tendulkar Talked About Right to Play On The Occasion Of 73rd Republic Day
Video: 'पद्मश्री' नीरज चोप्राची कॅलिफोर्नियावरून आली प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरने प्रतासत्ताक दिनानिमित्त ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. याच दिवशी १९५० मध्ये भारताने संविधानाचा (Constitution) स्विकार केला होता. भारतीय संविधानाला कायदे, अधिकार, अध्यादेश असे अनेक कंगोरे आहेत. या आधारे आपला भारत भक्कमपणे पुढे जात आहे. पण, आज मी एका वगेळ्या अधिकाराबद्दल खेळण्याच्या अधिकाराबद्दल (Right to Play) बोलणार आहे. संयुक्त राष्टामध्येही याबाबत चर्चा झाली आहे. भारतानेही खेळण्याच्या अधिकाराला मान्यता दिली आहे.'

Sachin Tendulkar Talked About Right to Play On The Occasion Of 73rd Republic Day
'खाशाबा जाधवांसाठी आता मोदी - शहांना भेटायचं तेवढं राहिलंय'

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्या व्हिडिओत पुढे म्हणतो, 'हा एक मजेदार अधिकार आहे. संयुक्त राष्टालाही मुलांच्या आरोग्य आणि वाढीसाठी खेळणे किती महत्वाचे आहे याची जाणीव आहे. खेळ खेळणारी राष्ट्रांमागेही हाच विचार आहे. खेळ फक्त पाहू नका तो खेळा देखील. खेळ हा फक्त मुलांच्या आरोग्यासाठी लाभदायक नाही तर सर्वांसाठी तो फायद्याचा आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com