'हाताची पाचही बोटं सारखी नसतात... 'सचिनने पुजाराला दिला खास सल्ला: Sachin Tendulkar To Cheteshwar Pujara Not all five fingers are the same | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara : 'हाताची पाचही बोटं सारखी नसतात... 'सचिनने पुजाराला दिला खास सल्ला

सध्या क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. सचिनने फलंदाज चेतेश्वर पुजाराला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास सल्ला दिला आहे.

चेतेश्वर पुजाराने काल ३५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सचिनने त्याच्या खास शैलित पुजाराला शुभेच्छा दिल्या आहे. त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.

Jasprit Bumrah Fitness : जसप्रीत बुमराहचं कारायचं काय; एका पाठोपाठ एक मालिकांमधून माघार

"पाचही बोटे सारखी नसतात. प्रत्येक कसोटी फलंदाजाला मोठा हिटर असण्याची गरज नाही. आक्रमक फलंदाजी सुद्धा चांगला बचाव करण्यास सक्षम असायला हवी. पुजारा, तू भारताच्या फलंदाजीत खडा आहेस. अद्वितीय राहा, कायम रहा! वाढदिवसाच्या शुभेच्छा,” तेंडुलकरने पुजारासोबतचा फोटो अपलोड करताना ट्विटरवर म्हटले आहे. अशा आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.

हेही वाचा: Australian Open Sania Mirza : आमचं नातं सॉलिड! मी 14 वर्षाची असताना रोहन... सानिया फायनमध्ये पोहचल्यानंतर भावूक

टीम इंडियासाठी पुजारा अनेकवेळा संकटमोचक बनला आहे. त्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे त्याची भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी तुलना केली जाते, ज्याला 'द वॉल' म्हणूनही ओळखले जाते.