esakal | सानिया मिर्झाची बहिण होणार अझरूद्दीनची सून!
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza Sister Anam Mirza to Marry Mohammd Asaduddin son of former Indian captain Mohammad Azaruddin

सानियाची बहिण अनम मिर्झा आता अझरूद्दीनची सून होणार आहे.     

सानिया मिर्झाची बहिण होणार अझरूद्दीनची सून!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रीडा क्षेत्र आणि बॉलिवूड हे नातं खूप जुनं आहे. पण आता क्रिकेट आणि टेनीस असंही नातं बहरणार आहे. कारण टेनिसपटू सानिया मिर्झा आणि भारताचा माजी कर्णधार महंम्मद अझरूद्दीन आता विहिण-व्याही होणार आहेत. सानियाची बहिण अनम मिर्झा आता अझरूद्दीनची सून होणार आहे.     

या अभिनेत्रीचा 20 वर्षांपूर्वीचा बिकिनीतील फोटो झाला व्हायरल

महंम्मद अझरूद्दीनचा मुलगा महंमद असदुद्दीन याचा निकाह सानियाची बहिण अनम मिर्झाशी होणार आहे. गेले काही दिवस त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे व त्यांचा निकाह या डिसेंबरमध्ये होणार असून या चर्चेवर सानियाने शिक्कामोर्तब केले आहे. सानिया, तिची बहिणी अनम व तिच्या मैत्रिणी नुकत्याच पॅरिसवरून अनमची बॅचलर्स पार्टी करून परतल्या आहेत.  

अनम आणि असद डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकतील, त्यामुळे आम्ही दोन्ही कुटूंबिय खूश आहोत. तसेच सगळेजण या लग्नसोहळ्यासाठी खूप उत्सुक आहेत, असे सानियाने सांगितले. काही दिवसांपूर्वी सानियाने इन्स्टाग्रामवर असदसोबत फोटो शेअर करत 'फॅमिली' असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलं होतं. 

अनम ही फॅशन स्टायलिस्ट आहे, तर असद हा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. अनमचे हे दुसरे लग्न असून 2015 मध्ये अकबर रशीदशी तिने लग्न केले होते.