

Sanjay Manjrekar Criticizes BCCI
esakal
नवी दिल्ली: भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अलीकडील शिस्तभंगाच्या घटनांवरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यावर टीका केली आहे. या दोन्ही खेळाडूंना अशा वर्तनाबद्दल विशेष कारवाई न करता सोडून दिल्यास ते भविष्यातही अशीच वर्तणूक करण्यासाठी ‘सराईत’ होतील, असा इशारा मांजरेकर यांनी दिला.जयस्वाल आणि सूर्यवंशी हे दोघेही मैदानावरील वादग्रस्त घटनांमध्ये सहभागी होते. टीकेनंतरही जयस्वालने आपल्या कृतीचे समर्थन केले होते.