
Supreme Court Dismisses Demand To Cancel India Pakistan Cricket Clash
Esakal
आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला सामना होणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यातला सामना रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती जेके महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.