
Shahid Afridi Slams Pakistan Team Before IND vs PAK Final
Esakal
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी क्रिकेट संघाचीच लाज काढली. भारत पाकिस्तान यांच्यात फायनलआधी शाहीद आफ्रिदीनं केलेल्या टीकेची सध्या चर्चा होत आहे. पाकिस्तानला जर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायचं असेल तर बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांच्यासारखे उत्कृष्ट फलंदाज ते संघात घेऊ शकले असते. गेल्या वर्षीपासून त्यांना टी२० संघातून वगळलं आहे. सध्या आशिया कप २०२५ स्पर्धा सुरुय. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने सामने आले. या दोन्ही सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. यामुळे आता अंतिम सामन्यातही असंच घडेल अशी भारतीय पाठिराख्यांना आशा आहे.