Shivam Dube : शिवम दुबेच्या 60 धावांची खेळी अन् हार्दिक पांड्याचे वाढले ह्रदयाचे ठोके

Shivam Dube
Shivam Dubeesakal

Shivam Dube Vs Hardik Pandya : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने गोलंदाजी आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने 2 षटकात 9 धावा देत 1 विकेट घेतली. याचबरोबर मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. त्याने सामन्यात हार्दिक पांड्याची उणीव भासू दिली नाही.

भारताची सुरूवात खराब झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 44 धावांची भागीदारी रचून डाव सावरला. अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी शिवम दुबे हा हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून खेळतोय. शिवम दुबेने षटाकर आणि चौकार मारत अफगाणिस्तानविरूद्धचा सामना संपवला होता.

Shivam Dube
रिदम सांगवानची भारतासाठी ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी ; महिलांच्या २५ मीटर पिस्तूल या प्रकारात ब्राँझपदक

शिवम दुबेने जितेश शर्माच्या साथीने देखील 45 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच भारताचा विजय निश्चित झाला. तर रिंकू सिंहने 9 चेंडूत 16 धावा करत शिवम दुबेला चांगली साथ दिली. या दोघांनी देेखील 42 धावांची भागीदारी रचली.

हार्दिक पांड्याचे वाढवले टेन्शन

शिवम दुबेने पहिल्याच सामन्यात 40 चेंडूत 60 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. दुबेने संधी मिळताच आपले अष्टपैलूत्व सिद्ध करून दाखवलं. त्याने दोन षटकात 9 धावा देत एक विकेट घेतली.

दुबेच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे हार्दिक पांड्याचे टेन्शन नक्कीच वाढलं असणार. पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. जर शिवम दुबेने संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली आणि आयपीएलमध्ये देखील प्रभावित केलं तर टी 20 वर्ल्डकपच्या संघात त्याचा निक्कीच विचार केला जाऊ शकतो.

Shivam Dube
श्रेयस पाच वर्षांनंतर रणजीमध्ये ; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव

धोनीने पाडले पैलू

शिवम दुबेने 2019 मध्ये भारतासाठी पहिला टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याने वनडे क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केलं. मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. त्याने त्याचे संघातील स्थान देखील गमावले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याचं नशिबच पालटलं.

धोनीच्या सहवासात आल्यानंतर शिवम दुबेच्या खेळात कमालीची सुधारणा झाली. आयपीएल 2022 च्या लिलावात धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला रिटेन केलं. आता शिवम दुबेने तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्याला 2023 मध्ये झालेल्या आशियाई गेम्समध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com