
शोएब अख्तर म्हणतो, 'मेलबर्नमध्ये आम्ही भारताला पुन्हा...'
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्याची दोन्ही देशातील क्रिकेट चाहते चातकाप्रमाणे वाट बघत असतात. या वर्षी पुन्हा भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2022) साखळी फेरीतच भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर रंगणार आहे. पाकिस्ताने गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारताचा इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभव केला होता. हाच धागा पकडून पाकिस्तानचा माजी वेगावान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारताला पुन्हा पराभूत करण्याची वल्गना केली आहे. (Shoaib Akhtar said Pakistan will beat India in T20 World Cup at Melbourne)
हेही वाचा: VIDEO : पांड्याला 'पुष्पा'च लागीर झालं जी! आजीसोबत भन्नाट डान्स
याबाबत शोएब अख्तर एएनआयशी बोलताना म्हणाला, 'आम्ही मेलबर्नमध्ये (Melbourne) पुन्हा एकदा भारताला हरवू पाकिसानचा टी २० संघ तगडा आहे. भारतीय मीडिया भारत पाकिस्तान सामन्यावेळी त्यांच्या संघावर अनावश्यक दबाद टाकतो. भारत हरणे ही सामन्य गोष्ट आहे.'
गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. भारत गेल्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलला पात्र देखील झाला नव्हता.
हेही वाचा: 'तो आता निष्काळजी मुलगा राहिला नाही' असं कार्तिक कोणाला म्हणाला?
यंदाचा ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्डकप (T20 World Cup Australia) १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वर्ल्डकपचे सामने एमसीजी मेलबर्न, सिडनी क्रिकेट ग्राऊंड, पर्थ, हॉबर्ट, अॅडलेड ओव्हल, गाबा आणि कार्डिनिया पार्क गीलाँग या सात ठिकणी होणार आहेत.
Web Title: Shoaib Akhtar Said Pakistan Will Beat India In T20 World Cup At Melbourne
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..