Shoaib Akhtar Says Virat Kohli Should Retire From T20 Cricket
Shoaib Akhtar Says Virat Kohli Should Retire From T20 Cricket esakal

Virat Kohli : ...म्हणून विराटनं टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी; शोएबचा अजब सल्ला

Virat Kohli Shoaib Akhtar Retirement : भारताने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा करत विनिंग इनिंग खेळली. विराटच्या टी 20 कारकिर्दितील हे सर्वोत्तम खेळी पैकी एक खेळी ठरली. या खेळीचे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील कौतुक केले. मात्र हे कौतुक करताना त्याने विराट कोहलीला एक अजब सल्ला दिल्ला. शोएब म्हणाला की, विराट कोहलीने आता आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला हवी.

Shoaib Akhtar Says Virat Kohli Should Retire From T20 Cricket
T-20 World Cup : भुकेलेल्या रोहित शर्माला मराठी पत्रकाराचा डब्बा, ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची आबाळ

शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना पाकिस्तान संघाचे तोंडभरून कौतुक केले. इफ्तिकार अहमद आणि शान मसूद यांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला 159 धावांपर्यंत पोहचवले. शोएबने या दोघांचे कौतुक केले. याचबरोबर हारिस रौऊफ आणि नसीम शाहची देखील पाठ थोपटली. या दोघांनी भारताची अवस्था 4 बाद 31 धावा अशी केली होती.

शोएब अख्तर म्हणाला की, 'पाकिस्तानने दमदार कामगिरी केली आहे. तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही सर्व खरोखरच चांगले खेळला. भारताने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी इतिहासातील सर्वश्रेष्ठ सामना जिंकला आहे. हा वर्ल्डकपमधील जबरदस्त सामना होता. यात सर्व काही होतं, कॅच सुटला, रन आऊट, नो बॉल, विवाद स्टंपिंग. वर्ल्डकप आता कुठे सुरू झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा लढत होईल.'

Shoaib Akhtar Says Virat Kohli Should Retire From T20 Cricket
T20 World Cup : टीम इंडिया उपाशी! ऑस्ट्रेलियन जेवणावर टाकला बहिष्कार, वाचा कारण

अख्तर विराट कोहलीबद्दल बोलताना म्हणाला की, 'ज्यावेळी उद्येश पूर्ण होत नसतो त्यावेळी विश्वास बळकट होत असतो ज्यावेळी विश्वास बळकट असतो त्यावेळी तुमचे व्यक्तीमत्व उजळून बाहेर येते. या सर्वाचे नाव म्हणजे विराट कोहली. मला असं वाटतं की विराट आयुष्यातील सर्वात मोठी खेळी खेळून गेला. हे शक्य झालं कारण त्याला विश्वास होता की तो करून दाखवेल. विराट ही खेळू शकला कारण त्याच्याकडे आत्मविश्वास आणि ते व्यक्तीमत्व होते.

या कौतुकानंतर अख्तरने विराट कोहलीला एक अजब सल्ला दिला. तो म्हणाला की, 'विराट कोहलीने धडाकेबाज पुनरागमन केले आहे. माझी अशी इच्छा आहे की विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. मला असे वाटत नाही की त्यांनी आपली संपूर्ण शक्ती टी 20 क्रिकेटमध्ये खर्च करावी. आज ज्या प्रकारे विराटने झुंजार वृत्ती दाखवली ही जर वनडेमध्ये दाखवली तर तो तीन शतके सहज ठोकू शकतो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com