Shoaib Akhtar PAK vs ZIM : पाकच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर रागानं झालाय लाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shoaib Akhtar Blame Captain Babar Azam

Shoaib Akhtar PAK vs ZIM : पाकच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर रागानं झालाय लाल

Shoaib Akhtar Blame Captain Babar Azam : टी 20 वर्ल्डकप सुपर 12 च्या फेरीत बलाढ्य पाकिस्तानचा झिम्बाब्वेने अवघ्या 1 धावेने पराभव करत एक मोठा धमाका केला. या धमाक्यानंतर पाकिस्तान क्रिकेट पुरतं हादरून गेलं आहे. आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू पराभवाचा बाप शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर तर रागाने लाल झाला असून त्याने थेट कर्णधार बाबर आझमला दोषी धरले. बाबर आझम हा एक खराब कर्णधार आहे असे बोचरे वक्तव्य त्याने केले. हे वक्तव्य त्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना केले.

हेही वाचा: Babar Azam : मॅच विनर ठरला खलनायक, पराभवानंतर बाबर म्हणतो, 'निराश..'

शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'तुम्हाला हे समजेणे इतके का जड जात आहे. मी हे यापूर्वीही बोललो आहे. आता मी पुन्हा सांगतो की आपण आपल्या याच ओपनिंग आणि मिडल ऑर्डर बॅटिंग लाईन अपला घेऊन मोठी कामगिरी करू शकतो. आपण आपल्या विजयात सातत्य राखू शकतो. मात्र पाकिस्तानचा कर्णधार चांगला नाही. पाकिस्तान संघ जवळपास वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. भारताविरूद्ध शेवटच्या तीन षटकात शेवटचे षटक मोहम्मद नवाझकडून टाकून घेण्यात आले.'

हेही वाचा: Virat Kohli: 'मानलं भाऊ'...सुर्यकुमार यादवच्या 'त्या' कमेंट वर विराटचा भन्नाट रिप्लाय

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, 'बाबर आझमला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले पाहिजे. संघात सर्वात मोठा कच्चा दुवा हा शाहीन आफ्रिदीचा फिटनेस आहे. त्यानंतर कॅप्टन्सी आणि संघव्यवस्थापनही कुचकामी आहे. नक्कीच आम्ही पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देतो. मात्र तुम्ही कोणत्या ब्रँडचे क्रिकेट खेळचा हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी संघातील त्रुटी तुम्हाला सामना जिंकून देतील या मानसिकतेने तुम्ही स्पर्धेत उतरू शकत नाही.'