Shoaib Akhtar : अरे भाऊ PCB चेअरमन आहेस... रमीझ राजांची रावळपिंडी एक्सप्रेसने केली धुलाई

Shoaib Akhtar Take A Dig on Ramiz Raja
Shoaib Akhtar Take A Dig on Ramiz Rajaesakal

Shoaib Akhtar Take A Dig on Ramiz Raja : रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटी इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. चौथ्या दिवशीपर्यंत सामना हा अनिर्णित होणार असे वाटत होते. मात्र इंग्लंडने आपला दुसरा डाव आधीच घोषित करत पाकिस्तनसमोर 343 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर सामना संपण्यासाठी अवघी काही षटके राहिली असताना पाकिस्तानला दुसऱ्या डावात 268 धावात गुंडाळत सामना खिशात टाकला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी खेळाडूंनी पीसीबीपासून संघापर्यंत सर्वांवर टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरनेही संघाच्या मानसिकतेवर टीका केली. तसेच पीसीबी चेअरमन रमीझ राजा यांना देखील टोमणा हाणला.

Shoaib Akhtar Take A Dig on Ramiz Raja
Sanju Samson : सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या संजूला मिळाली ऑफर; आता आयर्लंडकडून खेळणार?

शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना इंग्लंड संघाच्या मानसिकतेचे कौतुक केले. त्याने मॅक्युलची देखील स्तुती केली. मॅक्युलमने ड्रेसिंग रूममधील वातावरण उत्तम ठेवले आहे. अख्तर पुढे म्हणाला की, 'दोन्ही संघाच्या मानसिकतेत अंतर आहे. इंग्लंडने चौथ्या दिवशी आपला डाव घोषित केला. पाकिस्तानच्या संघाने असे केले असते का? पाकिस्तान ड्रॉसाठी गेला नसता? तुमच्यात धाडस नसेल तर तुम्ही खेळू शकत नाही.'

Shoaib Akhtar Take A Dig on Ramiz Raja
IND vs BAN : स्लॉग ओव्हरमध्ये पुन्हा भारताची धुलाई; बागंलादेशच्या मेहदीने शेवटच्या पाच षटकात..

अख्तरने यानंतर रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत हात वर करणाऱ्या पीसीबी चेअरमन रमीझ राजा यांना देखील टोमणे हाणले. तो म्हणाला, 'चेअरमन स्वतःच सांगत आहेत की आम्हाला एक चांगली खेळपट्टी तयार करायला हवी होती आणि इंग्लंडने चांगली फलंदाजी केली. अरे भाऊ तुम्ही पीसीबीचे चेअरमन आहात. तुमच्याकडे चांगली खेळपट्टी तयार करण्याचा अधिका आहे. पाकिस्तानने त्यांना मिळालेल्या संधीचा देखील फायदा उठवला नाही. इंग्लंडने त्यांना कसोटी वाचवण्याची संधी दिली. मात्र पाकिस्तानने ही संधी दवडली.'

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com