Shubman on Iyer | IND vs NZ: श्रेयस अय्यरचं पदार्पणातच दमदार अर्धशतक; शुभमन गिल म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer

पहिल्या दिवसअखेर भारताची धावसंख्या २५०पार

श्रेयस अय्यरचं पदार्पणातच दमदार अर्धशतक; शुभमन गिल म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

कानपूर: "जेमीसनने चांगला टप्पा दिशा पकडून गोलंदाजी टाकली. त्याचा बाहेर जाणारा चेंडू चांगला जात होता. मधल्या सत्रात ४ प्रमुख फलंदाज बाद झाले असताना श्रेयस अय्यरवर जबाबदारी आली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने खूप समजूतदारपणे फलंदाजी केली. त्याने जाडेजाबरोबर केलेली भागीदारी भारतीय संघाला योग्य जागी घेऊन गेली. जाडेजाचे अर्धशतकानंतर तलवार फिरवणे सगळ्यांनाच आवडते, सगळे त्याची वाट बघत असतात. पण श्रेयसने केलेला खेळ खूपच चांगला होता", अशा शब्दात शुबमन गिलने कसोटी पदार्पणातच अर्धशतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरची पाठ थोपटली.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

"मी अर्धशतकानंतर बाद झाल्याचं दु:ख"

श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल दमदार फलंदाजी करत होते. पण शुबमन गिल अर्धशतक झाल्यानंतर ५२ धावांवर बाद झाला. त्याबद्दल बोलताना गिल म्हणाला, "थोड्या कालखंडानंतर मला कसोटी सामना खेळायला मिळाला होता, त्यातून मैदानात प्रेक्षक हजर होते. हे सगळेच मला आनंद आणि प्रेरणा देणारे होते. अर्धशतक करून बाद झाल्याचे मला वाईट वाटले. कारण चांगली फलंदाजी मला जमू लागली होती."

हेही वाचा: IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

कानपूरला ५ वर्षांनी कसोटी सामना होत आहे. असं असूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ग्रीन पार्क मैदानावर आलेले दिसले नाहीत. पण जे प्रेक्षक मैदानावर हजर होते, त्यांनी भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला. प्रेक्षकांवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे गारुड किती जास्त आहे, याचा सामना बघताना अनुभव आला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नो बॉल टाकल्यानंतर फ्री हिट नाही का? अशा प्रश्नार्थक नजरा पाहायला मिळाल्या.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

दरम्यान, पहिल्या दिवसअखेर भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५८ धावा केल्या. सलामीवीर मयंक अग्रवाल १३ धावांवर स्वस्तात माघारी परतला. चेतेश्वर पुजारा (२६) आणि अजिंक्य रहाणे (३५) या दोघांना चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीवीर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यानंतर ५२ धावांवर तोदेखील बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. त्यानंतर पदार्पणाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. दोघांनी आपापली अर्धशतके ठोकत नाबाद ११३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीच्या बळावरच भारताने २५८ धावांपर्यंत मजल मारली.

सेना खासदार म्हणतो आम्ही राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू | Sanjay Jadhav | Shivsena | NCP| Sakal Media

सेना खासदार म्हणतो आम्ही राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू | Sanjay Jadhav | Shivsena | NCP| Sakal Media
परभणी Parbhani: घनसावंगी येथील शिवसेना (Shivsena)मेळाव्यात बोलताना परभणीचे खासदार संजय जाधव (Parbhani MP Sanjay Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)टीका केली. राष्ट्रवादीचा आपल्याला जिल्ह्यात खूप त्रास असल्याचा आरोप करत जीव जायला आल्यावर माकडीन आपल्या पिल्लाला पायाखाली घालते, तेव्हा आम्ही राष्ट्रवादीला (NCP) केव्हाही बुडवू, असा इशाराही जाधव यांनी यावेळी दिला. परभणीच्या जिल्हाधिकारी (Parbhani collector)पदावरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी आपणच जिल्हाधिकाऱ्यांची बदली करू नका, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती, अशी जाहीर कबुलीही दिली.
#Parbhani #shivsena #SanjayJadhav #NCP #Politics

loading image
go to top