Ranji Trophy 2020 : शुभमनची पंचांना शिवीगाळ अन् अख्खा दिल्लीचा संघ मैदानाबाहेर

वृत्तसंस्था
Friday, 3 January 2020

पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु असलेल्या रणजी सामन्यात मोठे नाट्य झाले. पंजाबचा सलामीवीर शुभमन गिलने मैदानावरील पंचांनी त्याला बाद असल्याचे घोषित केल्यावर त्यांना शिवीगाळ केली आणि मैदान सोडण्यास नकार दिला. 

नवी दिल्ली : पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु असलेल्या रणजी सामन्यात मोठे नाट्य झाले. पंजाबचा सलामीवीर शुभमन गिलने मैदानावरील पंचांनी त्याला बाद असल्याचे घोषित केल्यावर त्यांना शिवीगाळ केली आणि मैदान सोडण्यास नकार दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबची फलंदाजी सुरु असताना पंचांनी शुभमनला बाद घोषित केले. त्यावर त्याने नाराजी दाखवत पंच पश्चिम पाठक यांच्याकडे जाऊन शिवागाळ केली. पंच म्हणून पश्चिम पाठक यांचा हा पहिलाच सामना आहे. शुभमनने शिवीगाळ केल्यानंतर पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेत तो बाद झाला नसल्याचे जाहीर केले. मात्र, या सर्व प्रकाराने नाराज झालेले दिल्लीचे खेळाडू मैदान सोडून निघून गेले आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. 

दिल्लीचे खेळाडू मैदान सोडून गेल्यावर सामन्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन पुन्हा सामना सुरु केला. त्यानंतर शुभमन गिल 41 चेंडूंत 23 धावा करुन बाद झाला. सध्या एलिट अ आणि ब गटात 17 गुणांसह पंजाब पहिल्या स्थानावर आहे. 

विराटने केली अशी हेअरस्टाईल की सगळे बघतच राहिले!

भारत 24 जानेवारीपासून न्यूझीलंड मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये दाखल होईल. शुभमन गिल भारत अ संघाचा कर्णधार आहे. त्याच्या आजच्या वागणूकीवर जर बीसीसीआयने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा संघातील सहभाग धोक्यात येऊ शकतो.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubman Gill abuses umpire after being given out decision overturned