Shubman Gill IND vs ENG : 72 चेंडूत 5 वेळा बाद... शुबमन गिल अँडरसनच्या सापळ्यात अलगद सापडला

Shubman Gill India Vs England : शुभमन गिलने गेल्या 12 डावात फक्त दोनवेळाच 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Shubman Gill
Shubman Gillesakal

Shubman Gill IND vs ENG : विशाखापट्टणमच्या फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळपट्टी पोषक असूनही भारताचे दोन फलंदाज पहिल्या सत्रातच बाद झाले. रोहित शर्मा 14 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल लंचला काही मिनिटेच शिल्लक असताना जेम्स अँडरसन सेट होऊ पाहणाऱ्या शुभमन गिलला सापळा रचून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. गिलने 46 चेंडूत 34 धावा केल्या.

Shubman Gill
Ind vs Eng : मोहम्मद सिराजचा अचानक टीम इंडियातून पत्ता कट, BCCI ने सांगितले कारण

भारताचा सलामीवी यशस्वी जयस्वाल हा एका बाजूने चांगली फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने मात्र रोहित शर्मा आणि शुभमन गिलने त्याची साथ सोडली. पहिल्या कसोटीत 23 आणि 0 धावा करणाऱ्या शुभमन गिलवर आजच्या सामन्यात चांगल्या धावा करण्याचा दबाव होता. त्याने सुरूवात देखील चांगली केली. 46 चेंडूत पाच चौकारासह 34 धावा केल्या.

मात्र जेम्स अँडरसनने गिलला सापळा रचून पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. विशेष म्हणजे गिलने गेल्या 12 डावात फक्त दुसऱ्यांदा 30 धावांपेक्षा जास्त धावा केल्या. अँडरसनने 28 व्या षटकात सुरूवातीचे चार चेंडू हे इन स्विंग टाकले. त्यावर गिलने अत्यंत चांगले डिफेन्स केले. मात्र पाचवा चेंडू अँडरसनने विकेटच्या बाहेर टाकला. त्याने आपली लाईन चेंज करत गिलला फटका मारण्यास भाग पाडले. त्यातच चेंडू गिलच्या बॅटची कडा घेऊन विकेटकिपर बेन फोक्सच्या हातात गेला.

Shubman Gill
Ind vs Eng 2nd Test 1st Day Live : लंचनंतर खेळ सुरू...! 3 तासात घडलेल्या नाट्यमय घडामोडी; दोन मोठे धक्के तर...

शुभमन गिलचा दुसऱ्या कसोटीत देखील खराब फॉर्म सुरूच राहिला. त्याची कसोटीतील फलंदाजीची सरासरी 30 च्या आत आली आहे. त्याने आतापर्यंत 22 कसोटी साने खेळले आहेत. 2022 मध्ये त्याची सरासरी 29.66 इतकी होती. त्यानंतर 2023 मध्ये 28.66 इतकी झाली. आता 2024 मध्ये सरासरी घसरून 20 वर आली आहे.

शुबमन गिल अँडरसनची आवडती शिकार

शुभमन गिलचे अँडरसनविरूद्धचे रेकॉर्ड खराब आहे. गिलने कसोटीतील सात डावात अँडरसनच्या 72 चेंडूंचा सामना केला आहे. त्यात गिलला फक्त 39 धावाच करता आल्या. तर तो 7 वेळा बाद झाला आहे.

  • 7 - डाव

  • 72 - चेंडू

  • 39 - धावा

  • 5 - विकेट्स

  • 7.80 - सरासरी

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com