
West Indies vs Zimbabwe : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला 153 धावात रोखले. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी 10 षटकात 1 बाद 77 धावांवर असणाऱ्या वेस्ट इंडीजची अवस्था 6 बाद 101 धावा अशी केली. सिकंदर रझाने 4 षटकात 19 धावा देत 4 बळी टिपले. विंडीजकडून जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक 45 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. विशेष म्हणजे पात्रता फेरीच्या ग्रुप बी मध्ये असलेल्या वेस्ट इंडीजला स्कॉटलँडने पहिल्या सामन्यात 42 धावांनी मात दिली होती. जर आजचा दुसरा सामन्यात झिम्बाब्वेने विंडीजचे 154 धावांचे आव्हान पार केले तर विंडीजवर पात्रता फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढावू शकते.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करण्यााच निर्णय घेतला. त्यांच्यासाठी सामन्याची पहिली 10 षटके समाधानकारक राहिली. विंडीजने 10 व्या षटकात 1 फलंदाज गमावून 77 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. सिकंदर रझाने एव्हिन लुईसला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार निकोलस पूरन 7 धावांची भर घालून विलियम्सची शिकार झाला.
दरम्यान, एक बाजून लावून धरलेला जॉन्सनल चार्ल्स 36 चेंडूत 45 धावा करून धावबाद झाला. झिम्बाब्वेचा अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू सिंदकर रझाने शामराह ब्रुक्सला शुन्यावर बाद करत विंडीजची अवस्था 5 बाद 97 अशी केली. विंडीजने कसे बसे शतक पूर्ण केल्यानंतर सिकंदरने विंडीजला अजून एक धक्का दिला. त्याने जेसन होल्डरला 4 धावांवर बाद केले.
विंडीजची अवस्था 6 बाद 101 धावा अशी झाली असताना रोव्हमन पॉवेल आणि अकिल हुसैनने शेवटच्या 5 षटकात भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 49 धावांच्या भागीदारीमुळे विंडीज झिम्बाब्वेसमोर 154 धावांचे आव्हान ठेवू शकला. रोव्हमन पॉवेल 21 चेंडूत 28 धावा करून 20 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. तर अकिल हुसैनने 18 चेंडूत नाबाद 23 धावा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.