esakal | IND VS SL, 3rd ODI: मराठमोळ्या ऋतूराजची प्रतिक्षा संपणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad

IND VS SL, 3rd ODI: मराठमोळ्या ऋतूराजची प्रतिक्षा संपणार?

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना शुक्रवारी रंगणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर अनेक नवोदित अद्याप पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिका अगोदरच खिशात घातलीये. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (SL vs IND 3rd ODI India Rest Prithvi Shaw and Devdutt Padikkal or Ruturaj Gaikwad in Playing 11)

सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) यांना विश्रांती देऊन त्यांच्या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील पदार्पणातच ईशान किशनने दमदार अर्धशतक झळकावले होते. त्याच्यासह पृथ्वी शॉनेही तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. पण दुसऱ्या सामन्यात ही दोघेही स्वस्तात माघारी फिरले होते.

हेही वाचा: SL vs IND : द्रविड & धवन कंपनीच्या डिनर पार्टीची चर्चा!

श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळेल, असे द्रविड यांनी यापूर्वीच बोलून दाखवले होते. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉच्या जागी देवदत्त पदिक्कलला (Devdutt Padikkal) संधी मिळाली तर नवल वाटणार नाही. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय संजू सॅमसनलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे पहिल्या दोन वनडे सामन्यात तो उपलब्ध नव्हता. आता तोही फिट झालाय.

हेही वाचा: Olympics : उद्घाटनाला मोजके भारतीय खेळाडू राहणार उपस्थितीत

सूर्यकुमारला प्रमोशन मिळणार?

ईशान किशनला विश्रांती दिली तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला बढती मिळू शकते. तर पाचव्या क्रमांकाची जबाबदारी संजू सॅमसनच्या खांद्यावर पडेल. पहिल्या दोन वनडे सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मनिष पांडे चौथ्या क्रमांकावरच खेळताना दिसू शकतो. हार्दिक पांड्याची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजी वेळी हार्दिक पांड्याला कमरेला चमक भरल्याचा प्रकार घडला होता. परिणामी बॅटिंगवेळी त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे त्याच्या जागीही बदल दिसू शकतो. लोअर ऑर्डर आणि गोलंदाजीत फारसा बदल होईल, असे वाटत नाही.

भारतीय संभाव्य संघ Playing 11: शिखर धवन, देवदत्त पदिक्कल/ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार.

loading image