स्मृती मानधनाचा धडाकेबाज विक्रम; ऑस्ट्रेलियाची केली धुलाई!

Smriti-Mandhana-50
Smriti-Mandhana-50
Summary

गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात स्मृतीच्या नाबाद ८० धावा

IND vs AUS Pink Ball Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान दिवस रात्र पद्धतीचा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय महिला संघाचा हा पहिलाच दिवस रात्र पद्धतीचा कसोटी सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व राखले. महत्त्वाची बाब म्हणजे, या सामन्यात मराठमोळ्या स्मृती मानधनाने दमदार खेळी करत एक विक्रम रचला.

Smriti-Mandhana-50
"BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकत प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघी मैदानात आल्या. दोघींनी २५ षटके फलंदाजी करून ९३ धावांची अप्रतिम सलामी दिली. पण शफाली अर्धशतक करू शकली नाही. ६४ चेंडूत ४ चौकारांसह तिने ३१ धावा केल्या. पण स्मृती मानधनाने आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली. स्मृतीने दिमाखदार अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे गुलाबी चेंडूने दिवस रात्र कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

Smriti-Mandhana-50
विराट म्हणतो, "आम्ही कोणाला घाबरत नाही, म्हणूनच..."

शफाली वर्मा बाद झाल्यानंतर पुनम राऊतच्या साथीने स्मृतीने डाव पुढे नेला. स्मृती शतकाच्या दिशेने वाटचाल करत होती. पण अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे आणि खराब वातावरणामुळे केवळ ४४ षटकांचाच खेळ खेळण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मृती नाबाद ८० धावांवर खेळत होती. तिने ११४ चेंडूत १५ चौकार आणि एक षटकार लगावत आपली खेळी साजरी केली. पुनम राऊतनेही शेवटपर्यंत नाबाद राहत १६ धावा केल्या. या दोघींनी संघाला १ बाद १३२ धावांपर्यंत पोहोचवले. पण त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com