WBBL : स्मृतीचं शतक विक्रमी ठरलं, पण... (VIDEO) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smriti mandhana
WBBL : स्मृतीचं शतक विक्रमी ठरलं, पण... (VIDEO)

WBBL : स्मृतीचं शतक विक्रमी ठरलं, पण... (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

Smriti Mandhana Scores Century: भारतीय संघाची स्टार बॅटर स्मृती मानधानने (Smriti Mandhana) नवा विक्रम प्रस्थापित केलाय. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत तिने धमाकेदार शतक करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिडनी थंडर्सकडून खेळताना तिने मेलबर्न रेनेगेड्सच्या विरुद्ध 64 चेंडूत नाबाद 114 धावांची खेळी केली. 178.12 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. स्मृतीने आपल्या डावात 14 चौकार आणि 3 षटकार खेचले.

स्मृतीने शतक पूर्ण करण्यासाठी 57 चेंडूंचा सामना केला. 18 व्या षटकात स्मृती मानधनाने चांगलीच फटकेबाजी केली. पहिल्या पाच चेंडूत तिने अनुक्रमे 4,6,4,6,2 धावा करत शतकाला गवसणी घातली. या स्पर्धेत शतक करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरलीये.

हेही वाचा: Video: स्विंग मास्टर भुवी! पहिल्याच षटकात मिचेलची दांडी गुल

असा पराक्रम करणारी ती दुसरी महिला क्रिकेटर....

स्मृती मानधना ऑस्ट्रेलियात तीनही क्रिकेट प्रकारात शतक करणारी दुसरी बॅटर आहे. तिच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीने असा पराक्रम करुन दाखवला होता. मानधनाने यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या ऐतिहासिक डे नाईट कसोटी सामन्यात 216 चेंडूत 127 धावा केल्या होत्या. 2016 मध्ये तिने वनडे सामन्यात 109 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा: Video : रोहित-द्रविड नव्या पर्वाची सुरुवात 'युवागीरीनं', व्यंकटेशला संधी

स्मृती मानधनाने शतकी खेळी केली असली तरी तिचे हे शतक संघाला विजय मिळवून देण्यात उपयुक्त ठरले नाही. मेलबर्न संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 175 धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सिडनी संघाला निर्धारित 20 षटकात 2 विकेट गमावून 171 धावांपर्यंतच मजल मारता आली.

loading image
go to top