IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध Sneh Rana ने केली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारतीय गोलंदाज Sneh Rana चा भेदक मारा
sneh rana took 2 wickets for the 1st time t20
sneh rana took 2 wickets for the 1st time t20sakal

IND-W vs PAK-W Commonwealth Games Womens 2022 : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारतीय गोलंदाजाचा भेदक मारा आणि उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्वबाद 99 धावा केल्या. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्नेह राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली नाही, पण पाकिस्तानविरुद्ध या अष्टपैलू खेळाडूचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला.

sneh rana took 2 wickets for the 1st time t20
बॉक्सर वडिलांचे अधुरे स्वप्न जेरेमीने केले पूर्ण; गोल्ड जिंकून तिरंग्याला कडक सेल्युट

स्नेह राणाने टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. टी-20 तिने पहिल्यांदाच एका सामन्यात 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण पहिल्याच दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे सामना 18-18 षटकांचा करण्यात आला. प्रथम खेळताना पाकिस्तानचा संघ 99 धावा करून सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाला 100 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

sneh rana took 2 wickets for the 1st time t20
CWG2022 INDW vs PAKW Live : स्मृती मानधनाकडून पाकची धुलाई

पाकिस्तानने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर सलामीवीर फलंदाज मुनिबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. दरम्यान ऑफस्पिनर स्नेह राणाने 9 व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. आधी त्याने मारुफला एलबीडब्ल्यू केले नंतर त्याने शेवटच्या चेंडूवर मुनिबाला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com