esakal | #KheloIndia : सुदेष्णा,पार्थसह आता स्नेहाची दमदार कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

#KheloIndia : सुदेष्णा,पार्थसह आता स्नेहाची दमदार कामगिरी

खेला इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची पदकांची लयलूट सुरुच आहे. आजही (मंगळवार) महाराष्ट्रातील खेळाडू अव्वल कामगिरी करीत आहेत.

#KheloIndia : सुदेष्णा,पार्थसह आता स्नेहाची दमदार कामगिरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : गुवाहटी (आसाम) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहा सूर्यकांत जाधव हिने 21 वर्षाखालील गटात हॅमर थ्रोमध्ये रौप्यपदक पटकाविले. स्नेहाच्या हॅमर थ्रोची 50.57 मीटर अंतर इतकी मोजदाद झाली.

हेही वाचा -  कबड्डीपटूंची वयचोरी, जिल्ह्यावर तीन वर्षे बंदी

आज (मंगळवार) हॅमर थ्रोमध्ये दिल्लीच्या वर्षा कुमार (52.37 मीटर), महाराष्ट्राच्या स्नेहा जाधव (50.57 मीटर), हरियाणाच्या ऐश्‍वर्या रजनीश (50.15 मीटर) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्नेहा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यातील हजारमाची येथील रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्नेहाने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. तिच्या यशामुळे हजारमाची येथील ग्रामस्थांनी जल्लोष केला.

हेही वाचा - रुद्राक्ष पाटीलचा सुवर्णनेम, दियाही अव्वल

दरम्यान या स्पर्धेत सोमवारी (ता. 13) महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकरने सुवर्णपदक, पार्थ साळुंखेने कास्यपदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुलींनी चार मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सुदेष्णा शिवणकर, सृष्टी शेट्टी, प्रांजली पाटील, श्रेया शेडगे यांनी 48 सेंकदात हे यश मिळविले. तिरंदाजीत देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. त्यामध्ये साताऱ्यातील 17 वर्षांखालील गटात पार्थ साळुंखेने कास्यपदक पटकाविले. पार्थने रिकर्व्ह प्रकारात हे यथ मिळविले.

नक्की वाचा -  महाराष्ट्राच्या पदकांत तिरंदाजांची भर

 

loading image