Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

Sonam Maskar Wins Silver in 10m Air Rifle Team Event : कोल्हापूरची नेमबाज सोनम मस्करने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले.
Asian Games Shooting

Asian Games Shooting

esakal

Updated on

मुंबई : भारताच्या महिला नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या खेळातील १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. या संघामध्ये इलावेनिल वालारिवन व विदारसा विनोद यांच्यासह महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील सोनम मस्कर हिचाही समावेश होता. याप्रसंगी दैनिक ‘सकाळ’ने जपानमध्ये असलेल्या सोनम मस्कर हिच्याशी संवाद साधला. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पदक पटकावल्यानंतर आता मराठमोळ्या कन्येने नोव्हेंबर महिन्यात कतार येथे होत असलेल्या विश्वकरंडकात पदक पटकावण्याचे ध्येय बाळगले आहे.

सोनम ही मूळची कोल्हापूरची कन्या. नेमबाजी या खेळातील सरावामुळे ती बहुतांशी वेळ नवी दिल्लीत घालवावा लागतो. तसेच वडील, आई, भाऊ, बहीण असे तिचे कुटुंब आहे. सोनम स्वत: रेल्वेमध्ये नोकरी करते. सध्या विश्वकरंडकात छान कामगिरी करण्याकडे तिचे लक्ष्य असले तरी टप्प्याटप्प्याने ती प्रगती करणार आहे. ऑलिंपिकवरही तिची नजर आहे.

Asian Games Shooting
Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

भारतीय महिला नेमबाजांनी १,८९८ गुणांची कमाई करीत रौप्यपदकावर नाव कोरले. चीनच्या नेमबाजांनी १,९०४.२ गुणांसह सुवर्णपदकावर हक्क सांगितला. सुवर्णपदक हुकल्यानंतर सोनम म्हणाली की, आम्ही शूटिंग रेंजवर सर्वोत्तम प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी नेमबाजांनीही त्यांचा प्रयत्न केला. त्यांना सुवर्णपदक मिळवता आले. आम्हाला रौप्यपदक मिळाले. यामुळे आम्ही काही बाबींमध्ये कमी पडलो, असे मी म्हणणार नाही.

सोनम हिने याप्रसंगी एका बाबीवर सुधारणा करण्याचे मत व्यक्त केले. ती म्हणाली की, आशियाई स्पर्धेतील दोन प्रकारामध्ये मी अंतिम फेरीत पोहोचले. वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारामध्ये मला अंतिम फेरीत पोहोचता आले. सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावण्यात आपल्या भारतीय संघाला यश लाभले. वैयक्तिक प्रकारात मात्र मला अंतिम तीनपर्यंत मजल मारता आली नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या फायनलमध्ये कामगिरीत लक्षणीय सुधारणा करण्याचे लक्ष डोळ्यांसमोर ठेवले आहे.

Asian Games Shooting
Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

सोनम हिने आशियाई स्पर्धेतील रौप्यपदकाचे श्रेय देताना म्हटले की, मला इथपर्यंत मजल मारता आली, याचे श्रेय एकाला देणे योग्य ठरणार नाही. माझे कुटुंब, संघटना, प्रशिक्षक, रेल्वे, साई या सर्वांनाच मी माझ्या यशाचे श्रेय देईन. सोनम हिने सरावाबाबतही मत व्यक्त करताना म्हटले की, ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत भोपाळमध्ये सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com