

Rishab Das
esakal
टोकियो : भारतीय जलतरणपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रविवारी निराशेला सामोरे जावे लागले. भारताच्या रिषभ दासने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील अंतिम फेरीत ५४.७७ सेकंदांची वेळ नोंदवत सहावे स्थान मिळवले.
रिषभ दासने ५० मीटर अंतर २६.५६ सेकंदांत पूर्ण केले. तो सुवर्णपदक विजेता चीनच्या शू जियायूपेक्षा २.७९ सेकंद मागे राहिला. शू जियायूने ५१.९८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. जपानच्या हिदेकाझू ताकेहाराने ५३.९३ सेकंदांसह रौप्यपदक, तर दक्षिण कोरियाच्या ली जुहोने ५३.९४ सेकंदांसह ब्राँझपदक जिंकले.
रिषभ दासने अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना ५४.८५ सेकंदांची वेळ नोंदवली होती आणि तो एकूण पाचव्या क्रमांकावर राहिला होता. अंतिम फेरीत रिषभ दास जपानच्या दुसऱ्या क्रमांकावरील ताकेहारापेक्षा ०.६३ सेकंदांनी, तर चीनच्या आशियाई विक्रमधारक आणि हीटमधील अव्वल खेळाडू शू जियायूपेक्षा २.२२ सेकंदांनी मागे राहिला. शू जियायूने हीटमध्ये ५२.६३ सेकंदांची वेळ नोंदवली होती.
या प्रकारात सहभागी झालेला भारताचा दुसरा जलतरणपटू उत्कर्ष पाटील ५६.१९ सेकंदांच्या वेळेसह १२व्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्याला अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही.
दरम्यान, पुरुषांच्या १०० मीटर फ्री स्टाइलच्या हीटमध्येही भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारताचा बेनेडिक्शन बेनिस्टन ५०.२५ सेकंदांच्या वेळेसह १२व्या स्थानावर, तर आका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.